आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Seven Tier Security Cover To US President Barak Obama In India Visit

4000 पोलिसांच्या निगराणीत राहतील अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा, असे असतील 7 सुरक्षा कडे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत आग्र्यातील तामहाल बघायला जाणार आहेत. यावेळी त्यांच्या सुरक्षेसाठी सुमारे 4 हजार पोलिस तैनात राहतील. याव्यतिरिक्त अमेरिकी सिक्रेट सव्हिसचे 100 एजेंट, बुलेटफ्रुप गाड्या, हेलिकॉफ्टर आणि यमुना नदीत मोटरबोट निगराणीसाठी ठेवण्यात येणार आहेत.
बराक ओबामा यांच्या सुरक्षेसाठी सात स्तरीय सुरक्षा व्यवस्था राहणार आहे. यातील प्रत्येक कड्याच्या सुरक्षेची जबाबदारी स्वतंत्र अधिकाऱ्यावर सोपवण्यात आली आहे. प्रत्येक कड्याच्या वरीष्ठ अधिकाऱ्याकडे ओबामांच्या सुरक्षेची जबाबदारी असेल.
पहिले कडे
बराक ओबामा यांच्या अगदी नजीक असलेल्या या कड्याची जबाबदारी अमेरिकेची सिक्रेट सर्व्हिस आणि इतर एजेंसींकडे असेल. सिक्रेट सर्व्हिसच्या प्रत्येक कमांडोकडे अत्याधुनिक शस्त्रे आणि संदेशवहन यंत्रणा असेल. या कड्याच्या प्रत्येक कमांडोची माहिती बराक ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेल यांच्याकडे असेल.
कोण असेल जबाबदार
अमेरिकेच्या सिक्रेट सर्व्हिसचे प्रमुख जोसेफ पी. क्लेंसी यांच्याकडे या कड्याची जबाबदारी असेल. सिक्रेट सर्व्हिसमध्ये काम करण्याचा त्यांच्याकडे 27 वर्षांचा अनुभव आहे.
पुढील स्लाईडवर जाणून घ्या, बराक ओबामा यांच्या सुरक्षेसाठी तयार करण्यात येणारे इतर 6 सुरक्षा कडे... कोणाकडे आहे त्यांची जबाबदारी...