आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तर भारतात धुक्यामुळे जनजीवन विस्कळीत, 13 ठार, रेल्वे-विमान सेवेवर परिणाम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मिरामध्ये होणार्‍या हिमवृष्टीमुळे थंडीची लाट आणखी तीव्र झाली आहे. परिणामी दिल्लीसह उत्तर भारतात दाट धुके पसरले आहे. उत्तर भारतातील अनेक राज्यात धुक्यामुळे झालेल्या अपघातात आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला आहे.

व्हिजिबिलीटी कमी असल्याचा परिणाम रेल्वे आणि विमान सेवेवर झाला आहे. दिल्लीत दाट धुके पसरल्याने 16 रेल्वे गाड्या रद्द झाल्या, तर 89 रेल्वे गाड्या उशिराने धावत आहेत. त्याचप्रमाणे 8 आंतरराष्ट्रीय आणि 5 देशांतर्गत उड्डाणांवर परिणाम झाला आहे.

हरियाणात 15 वाहने एकमेकांवर धडकली...
हरियाणात 15 वाहने एकमेकांना धडकली. हिमाचल प्रदेशात रोहतांग, कुनझम व पहाडी भागातील पट्ट्यात, तसेच कुलू जिल्ह्यात किमान तापमान तीन ते पाच अंशने घसरले आहे.
त्याचप्रमाणेे बिहारमधील औरंगाबाद जिल्ह्यात कार अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. रस्त्याच्या कडेला उभ्या ट्रकवर ही कार आदळली.
लेहधील तापमान उणे 11
काश्मीरमध्ये सुरु असलेल्या हिमवृष्‍टीमुळे थंंडीची लाट आली आहे. लेेहमध्ये तापमान उणे 11.4 अंश सेल्सिअस वर आले आहे. लडाखमध्ये रात्री 1.3 तर कारगिलमध्ये उणे 9.1 अंश सेल्सियस तापमानाची नोंद घेण्यात आली आहे.

पुढील स्लाइडवर पाहा, दाट धुक्यांंमध्येे हरवलेला उत्तर भारत...
बातम्या आणखी आहेत...