आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुरगावमध्‍ये सेक्‍स रॅकेट: प्रमोशनसाठी बायकोला केले अधिका-यांच्‍या स्‍वाधीन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- गुरगावमध्‍ये पोलिसांनी एक हायप्रोफाईल सेक्‍स रॅकेटचा भंडाफोड केला आहे. परदेशातील 3 मुलींना अटक करण्‍यात आली आहे. दुसरीकडे मध्‍य प्रदेशमध्‍ये नव-यानेच पत्नीला पदोन्‍नतीसाठी वरिष्‍ठ अधिका-यांकडे पाठविल्‍याचा प्रकार उघडकीस आला आहे. जयपूरमध्‍ये तर एका उपसंचालक दर्जाच्‍या अधिका-याकडून पदोन्‍नतीसाठी महिला कर्मचा-याकडून लाच स्‍वरुपात तिची शैय्यासोबत करण्‍याची मागणी केल्‍याच्‍या आरोपात अटक केली आहे.

गुरगावमध्‍ये सेक्‍टर 39 भागात एका गेस्‍ट हाऊसमध्‍ये वेश्‍याव्‍यवसाय सुरु होता. पोलिसांनी सापळा रचुन छापा मारला. उझबेकीस्‍तानच्‍या 3 मुली, गेस्‍ट हाऊसचा मालक आणि इतर 4 जणांना अटक करण्‍यात आली. सर्वांना 14 दिवसांच्‍या न्‍यायालयीन कोठडीत पाठविण्‍यात आले आहे. या गेस्‍ट हाऊसमध्‍ये सेक्‍स रॅकेट सुरु असल्‍याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी बनावट ग्राहकाला पाठवून सापळा रचला. तीन परदेशी मुलीं सबीना, मलिका कुचकेरोव्‍हा आणि करीमोव्‍हा मुयासिरोह यांना अटक करण्‍यात आली. त्‍यांच्‍याकडे व्‍हीसा आणि पासपोर्ट नसल्‍याची माहिती पोलिसांनी दिली.

गेस्‍ट हाऊसचा संचालक दिपक हा मूळचा आंध्र प्रदेश येथील रहिवासी आहे. या रॅकेटचे तार कुठेकुठे जुळलेले आहेत, याची माहिती पोलिसानी शोधण्‍याचे काम सुरु केले आहे. पोलिसांनी याच वर्षी मार्चमध्‍येही छापा मारला होता. त्‍यावेळेस संचालक म्‍हणून दुसरा वयक्ती कामावर होता.

एमपीः प्रमोशनसाठी बायकोला केले अधिका-यांच्‍या स्‍वाधीन... वाचा पुढील स्‍लाईडमध्ये...