फाइल फोटो - स्वामी नित्यानंद
नवी दिल्ली - स्वंयघोषित संत स्वामी नित्यानंद याला पौरुषत्त्व चाचणीला (पोटेंसी टेस्ट) सामोरे जाण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. नित्यानंद स्वामीला 2010 मध्ये हिमाचल प्रदेशातून अटक करण्यात आली होती. त्याच्यावर बेंगळुरू येथे खटला सुरू आहे.
शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याची आपली क्षमताच नसल्याचे सांगत नित्यानंदने खटल्याच्या सुनावणी दरम्यान त्याच्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप फेटाळले होते. त्यानंतर न्यायालयाने नित्यानंदच्या काही वैद्यकीय तपासणी करण्याचे निर्देश दिले होते. या वैद्यकीय तपासण्या होऊ नये म्हणून, नित्यानंदने याचिका दाखल केली होती.
नित्यानंदचा बेंगळुरू येथे एक मोठा आश्रम आहे. सुमारे चार वर्षांपूर्वी त्याची एका अभिनेत्रीबरोबरची काही दृश्ये स्थानिक वाहिनीवरून प्रसारीत करण्यात आली होती. त्यानंतर नित्यानंद आश्रमातून फरार झाला होता. दोन महिन्यांनी त्याला हिमाचल प्रदेशातून अटक करण्यात आली होती. आश्रमातील चार सहका-यांनीही त्याच्यावर बलात्काराचे आरोप केले होते.
पुढे वाचा, याआधी कोर्टाने केली होती विचारणा