आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लैंगिक छळाचा आरोप; ‘आप’ आमदार अटकेत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - महिला नातेवाइकाने लैंगिक छळाचा आरोप केल्याने आम आदमी पक्षाचे आमदार अमानतुल्लाह खान यांना दिल्ली पोलिसांनी बुधवारी अटक केली. गेल्या तीन महिन्यांत त्यांना दुसऱ्यांदा अटक झाली आहे. आग्नेय दिल्लीचे संयुक्त पोलिस आयुक्त आर. पी. उपाध्याय यांनी सांगितले की, खान यांना पोलिस उपायुक्तांच्या कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. त्यांना लैंगिक छळ आणि दहशत निर्माण केल्याच्या आरोपावरून दुपारी २.१० मिनिटांनी अटक करण्यात आली. ‘मला सामान्य चर्चेसाठी उपायुक्तांच्या कार्यालयात बोलावण्यात आले होते, पण मला थेट अटक करण्यात आली,’ असा दावा खान यांनी ट्विटद्वारे केला आहे. अटकेनंतर खान यांना साकेत न्यायालयात हजर करण्यात आले. ‘मला अटक करण्यासाठी पोलिसांवर दबाव होता, त्यामुळे पोलिसांनी ही कारवाई केली, असा आरोपही खान यांनी केला आहे.
महिला नातेवाइकाने दिलेल्या तक्रारीवरून जामियानगर पोलिस ठाण्यात आमदार अमानतुल्लाह खान आणि या महिलेच्या पतीविरुद्ध लैंगिक छळ, दहशत निर्माण करणे, गुन्हेगारी कट असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, आम आदमी पार्टीच्या अनेक आमदारांवर भ्रष्टाचाराचेही आरोप लागल्याने पक्षाची देशपातळीवर बदनामी झाली आहे.

आधीही झाली होती अटक
याआधीही खान यांना २४ जुलैला अटक झाली होती. ‘आपण वीज कपातीचा मुद्दा उपस्थित करण्यासाठी खान यांच्या निवासस्थानी गेलो असता त्यांनी आपल्याला वाहनाखाली चिरडून ठार मारण्याचा प्रयत्न केला होता,’ असा आरोप जसोला येथील एका महिलेने केला होता. त्यामुळे त्यांना अटक झाली होती. त्यांची २८ जुलैला जामिनावर मुक्तता
झाली होती.
बातम्या आणखी आहेत...