आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लैंगिक छळाच्या फिर्यादीस तीन महिन्यांची पगारी रजा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- लैंगिक छळ प्रकरणात तक्रार करणाऱ्या महिलेला तीन महिन्यांची पगारी रजा द्या, असे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत. लैंगिक छळ प्रकरणातील तक्रारींची चौकशी गांभीर्याने व्हावी. सरकारी सेवकाविरोधातील केस मजबूत नाही या कारणावरून अशा तक्रारी निकाली काढू नयेत, असे निर्देशही शिस्तपालन अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

कार्मिक आणि प्रशिक्षण मंत्रालयाने दिलेल्या निर्देशांनुसार, अशा प्रकरणात तक्रार करणारी महिला अथवा ज्याच्याविरोधात तक्रार करण्यात आली आहे, अशा अधिकाऱ्याची तीन महिन्यांसाठी इतरत्र बदली करण्याचे अधिकार लैंगिक छळ प्रतिबंधक समितीला असतील. ही रजा तिच्या रजेच्या खात्यातून वजा करण्यात येणार नाही. विशाखा प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार सर्व मंत्रालये आणि आस्थापनांत तक्रार करण्यासाठी समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. अशा समितीची प्रमुख महिलाच असेल आणि समितीच्या निम्म्या सदस्यही महिलाच असतील.

३ महिन्यांत द्या तक्रार
घटनेनंतर तीन महिन्यांच्या आत तक्रार नोंदवावी. अशी घटना अनेकदा घडल्यास शेवटची घटना घडल्याच्या ३ महिन्यांत तक्रार करता येईल. मात्र, या मुदतीत परिस्थिती नसल्याने तक्रार नोंदवता आली नसल्यास मुदतवाढही मिळू शकते.
बातम्या आणखी आहेत...