आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sexual Harassment Of Women Judge, News In Marathi

न्यायाधिशांनी आयटम सॉंग्जवर डान्स करायला सांगितला, महिला न्यायाधीशांचा आरोप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- मध्‍य प्रदेशातील ग्‍वाल्हेरमधील एका महिला अतिरिक्‍त जिल्हा व न्‍यायाधीशांनी हायकोर्टाच्या एका न्यायाधीशांवर लैंगिक शोषणाचा आरोप करत राजीनामा दिला आहे.

'द टाइम्‍स ऑफ इंडिया'मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, पीडित न्यायाधीशांनी आरोप केला आहे की, आरोपी न्यायाधीशांनी त्यांना बंगल्यावर एका कार्यक्रमासाठी एक मेसेज पाठवून बोलावले होते. एवढेच नव्हे तर आपल्याला एका आयटम सॉग्जवर डान्स करण्यास जबरदस्ती केली होती. परंतु आपण मुलीच्या वाढदिवसाचे कारण सांगून कार्यक्रमाला जाणे टाळले होते. परंतु, दुसर्‍या दिवशी कोर्टात आमची भेट झाली असता, आपल्याला नाचताना बघण्याची संधी हुकल्याची टिप्पणी संबंधित न्यायाधीनांशी केली, तसेच यापुढे आपण या संधीची वाट पाहू, असेही म्हटल्याचे पीडित न्यायाधीशायांनी पत्रात म्हटले आहे.

या सगळ्या प्रकारामुळे आपली प्रतिष्‍ठा, नारीत्त्व आरि स्‍वाभिमान दुखावला गेला आहे. त्यामुळे आपण पदाचा राजीनामा देत असल्याचे पीडित न्याया‍धीशांनी म्हटले आहे. उल्लेखनीय म्हणजे पीडिता न्यायाधीश विशाखा समितीच्या सदस्या आहेत. कामाच्या ठिकाणी महिलांवर होणार्‍या अत्याचाराविरोधात ही समिती कार्य करते.

पीडित न्यायाधीशांनी मुख्‍य न्‍यायाधीश आर.एम.लोढ़ा, सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश एच.एल.दत्तू, टीएस ठाकूर, अनिल दवे, दीपक मिश्रा आणि अरुण मिश्रा याच्याशिवाय मध्‍य प्रदेश हायकोर्टच्या चीफ जस्टिसकडे तक्रार केली आहे. आरोपी न्यायाधीश आपल्याला त्यांच्या बंगल्यावर नेहमी एकटे बोलावतात. एका कार्यक्रमात आपल्याला बोलावून आरोपी न्यायाधीशांनी आपल्याला आयटम सॉग्जवर डान्स करण्‍यास जबरदस्ती केली होती.
पीडित महिला न्यायाधीश यांनी 15 जुलैला आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. याप्रकरणी मध्ये प्रदेश हायकोर्टाचे संबंधित न्यायाधिशांकडून अहवाल मागवण्यात वाला आहे. त्यानंतर कारवाई केली जाईल, असे चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हटले आहे. परंतु अद्याप पीडित महिला न्यायाधिशांकडून कायदेशीर तक्रार करण्‍यात आलेली नसल्याचेही चीप जस्टिस ऑफ इंडियाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, एप्रिल 2013 मध्ये पीडित न्यायाधीशांनी विशाखा समितीच्या अध्यक्ष बनवण्यात आले होते. कामाच्या ठिकाणशी महिलांवर होणार्‍या अत्याचाराविरोधात त्यांनी उत्कृष्‍ठ कार्य केले होते.