शहाबुद्दीन महंमद शाहजहान ऊर्फ शाहजहान याचा मृत्यू 22 जानेवारी 1666 रोजी झाला. त्याचा जन्म पाकिस्तानातील लाहोर प्रांतात झाला होता. त्याचे जन्मनाव खुर्रम होते. खुर्रमचा अर्थ आनंददायी असा होतो. भारतावर निर्विवाद सत्ता गाजवणाऱ्या मुघल राजघराण्यातील तो पाचवा राजा होता. त्याने 1628 पासून 30 वर्षे भारतातील बहुतांश भागावर अधिसत्ता गाजवली.
अकबर आणि जोधा यांचा मुलगा जहांगिर आणि त्याची हिंदू राजपूत पत्नी मानमती ऊर्फ ताज बिबी बिल्किस मकानी यांचा तो मुलगा होता. मारवाडचा राजा उदयसिंह यांची मानमती कन्या होती. अकबर आणि जहांगिर यांच्या तुलनेत शाहजहान कट्टर मुस्लिम होता. गैरमुस्लिम लोकांबाबत त्याची धोरणे कठोर होती. त्याचे मत अनुकूल नव्हते.
भारतीय सभ्यतेत शाहजहानचे शासन सुवर्ण युग आणि सर्वांत समृद्ध समजले जाते. 1627 मध्ये वडीलांचा मृत्यू झाल्यानंतर तो सिंहासनावर बसला. साम्राज्याचा विस्तार करण्यासाठी तो कायम प्रयत्नशिल होता. परंतु, 1658 मध्ये तो आजारी पडला. त्यानंतर त्याचा मुलगा औरंगजेबाने त्याला कैद करुन आग्र्याच्या किल्ल्यात कैद केले. मृत्यूपर्यंत शाहजहान याच किल्ल्यात कैद होता.
त्या काळी तब्बल 32 कोटी रुपये खर्च करुन ताजमहाल बांधणाऱ्या या सम्राटाचे अंतिम दिवस आग्र्याच्या किल्ल्यातून ताजमहल बघण्यात गेले. औरंगजेबाने नजरकैद केले असल्याने अंतिम दिवसांमध्ये ताजमहालाला स्पर्श करणेही त्याला शक्य नव्हते.
मुघल वास्तूकलेत शहाजहानचा काळ सुवर्णयुग म्हणून संबोधिले जाते. त्याने अनेक ऐतिहासिक इमारती बांधल्या. पण दुसऱ्या क्रमांकाची पत्नी मुमताज महाल हिची कब्र म्हणून बांधलेला ताजमहाल सर्वांत लोकप्रिय ठरला. ताजमहाल बांधण्यासाठी तब्बल 20,000 कामगारांनी अथक परिश्रम घेतले. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर या कामगारांचे हात कापण्यात आले. त्यांना अशी वास्तू पुन्हा बांधता येऊ नये म्हणून त्यांचे डोळे फोडले, असे सांगितले जाते. परंतु, हे खरे नसल्याचा दावा अनेकांनी केला आहे.
शाहजहान जिवंत असतानाचा चार मुलांमध्ये सिंहासनासाठी छेडले होते युद्ध... वाचा पुढील स्लाईडवर...