आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाढदिवशी शाहरुख म्हणाला- भारतात वाढत आहे कट्टरता, पुरस्कार परत करु शकतो

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आज 50 वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमीत्ताने एका चॅनलसोबत केलेल्या टाऊनहॉल कार्यक्रमात त्याने देशातील सध्याच्या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली. प्रश्नोत्तरांच्या या कार्यक्रमात शाहरुख म्हणाला, 'देशात असहिष्णुता वाढली आहे. जर मला कोणी विनंती केली तर प्रतीकात्मक निषेध करण्यासाठी मी देखील पुरस्कार परत करु शकतो. देशात वेगाने कट्टरता वाढली आहे.'

आणखी काय म्हणाला शाहरुख
>> इंग्रजी दैनिक इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानूसार, शाहरुखने वाढदिवसानिमीत्त इंडिया टुडेचे राजदीप सरदेसाईंसोबत चॅनल आणि ट्विटरवर टाऊनहॉल कार्यक्रम केला.
>> याच कार्यक्रमादरम्यान शाहरुख म्हणाला, 'कोणताही देशभक्त धर्मनिरपेक्षतेच्या विरोधात जाऊन चूक करतो.'
>> पुरस्कार वापसीवर शाहरुखने होकार भरला. तो म्हणाला, 'प्रतिकात्मक रित्या मी देखिल पुरस्कार परत करु शकतो. कारण देशात कट्टरता वाढली आहे.'
>> शाहरुखला भारतात मुस्लिम म्हणून जीवन जगत असल्याबद्दलच विचारलेल्या प्रश्नावर तो म्हणाला, 'माझ्या देशभक्तीवर प्रश्न उपस्थित करण्याची कोणातही हिम्मत नाही, आणि तसा प्रयत्नही कोणी करु शकत नाही.'

शाहरुखच्या वक्तव्याचा काय आहे संदर्भ
>> गोमांस असल्याच्या संशयावरुन उत्तर प्रदेशातील दादरीमध्ये एका व्यक्तीची ठेचून हत्या करण्यात आली. कन्नड लेखक कलबुर्गी यांच्या हत्येच्या निषेधार्थ साहित्यिकांनी पुरस्कार परत केले. त्याआधी महाराष्ट्रात कॉम्रेड पानसरेंचा खून करण्यात आला.
>> 40 हून अधिक साहित्यिकांनी साहित्य अकादमी पुरस्कार परत केले.
>> 13 इतिहासकार आणि काही शास्त्रज्ञांनी राष्ट्रीय पुरस्कार परत केले.
>> दिबाकर बॅनर्जींसारख्या 10 चित्रपट निर्मात्यांनी त्यांचे पुरस्कार परत केले.
>> एक दिवस आधीच प्रसिद्ध अभिनेत्री शबाना आझमींनी म्हटले होते, देशात इन्टॉलरेंस वाढला आहे. आपल्या सर्वांना प्रतिकात्मक रित्या आपले पुरस्कार परत केले पाहिजे.
>> दुसरीकडे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी याच मुद्यावर सोमवारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींची भेट घेणार आहेत.
बातम्या आणखी आहेत...