आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shahnawaz Hussain Renu Sharma Love Story New Delhi

करवा चौथ SPL - स्कूलबसमधून सुरू झालेली LOVESTORY, B\'Day ग्रिटींग देऊन केले प्रपोज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - राजकारणातील चढ उताराचे आयुष्य जेवढे रोचक असते तेवढेच त्यांच्या खासगी जीवनातील लव्ह स्टोरीसुध्दा रोचक असते. जेव्हा एक तरुण (शाहनवाज हुसैन) आपले कॉलेजचे शिक्षण पुर्ण करत असताना ज्या बसने जात होता त्याच बसमध्ये एक अत्यंत सुंदर मुलगी (रेणू)सुध्दा जात होती. ती मुलगी बारावीला होता. एकाच बसमधून येत-जात असल्याने दोघांची नेहमी भेट व्हायची. मात्र ते एकमेकांशी बोलत नव्हते. मात्र तरीही या मुलीच्या सुंदर डोळ्यांमध्ये हा तरूण असा काही डुबला की त्याने संपूर्ण आयुष्य तिच्यासोबत घालवण्याचे ठरवले. रेणूच्या वाढदिवसादिवशी शाहनवाज यांनी ग्रीटींग देत तिला विचारले की, 'Will U be My Life Partner'. हाच तो क्षण होता जिथून यांची प्रेम कहाणी सुरू झाली. मात्र ही स्टोरी एवढी सोपी नव्हती. या दरम्यान दोघांच्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले. मात्र देवाला जे करायचे होते तेच झाले. या दोघांनी 1994 मध्ये लग्न केले. चला तर मग पाहूयात कशी झाली या प्रेम कहाणीला सुरूवात...
"तिचे डोळे खुपच सुंदर आहेत, मी तिच्या डोळ्यात पाहिले आणि स्वतःला हरवून बसलो. तिचे डोळे खुप काही बोलतात." येथूनच सुरू झाले भाजपाच्या या दिग्गज नेत्याची लव्ह स्टोरी. मग काय तिच्या डोळ्यांचीच स्वप्ने पाहात पाहात त्यांनी तिला आपले बनवले. चित्रपटाची कथा आणि रोमिओ ज्यूलिएटप्रमाणे यांच्याही लव्हस्टोरीने जीवनात अनेक चढ-उतार आले, मात्र या दोघांनी एकमेकांची साथ सोडली नाही.
करवा चौथच्या मौक्यावर divyamarathi.com तुम्हाला या जोडीची प्रेमकहाणी सांगत आहे. ही एक अशी प्रेमकहाणी आहे जीने प्रेमाला धर्म नसतो असा संदेश दिला आहे. हे तर देवाच्या आशीर्वादाप्रमाणे आहे, ज्याचा अनुभव प्रत्येकाला जीवनात एकदातरी येतोच. त्याकाळात आपल्या प्रेमाकहाणीने एक उत्तम उदाहरण देत आज हे जोडपे एकमेकांसोबत खुप खुष आहे.
पुढील स्लाईडमध्ये वाचा, 1986 मध्ये सुरू झाली लव्ह स्टोरी