आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Shaharukh Khan Chennai Express Enters Into 100 Crore Club

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शाहरुखची 100 कोटी एक्स्प्रेस कमाई

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- बॉलीवूडच्या मोठ्या स्टारची खरी कमाई चित्रपटातून नव्हे, तर त्याच्या जाहिराती व कार्यक्रमांतून होते. प्रमोशनसाठी आयोजित कार्यक्रमातील सहभाग त्यांना कमाई करून देणारा ठरतो. चेन्नई एक्स्प्रेस शाहरुख खानसाठी मोठी कमाई करून देणारा ठरेल. यात शाहरुखची कंपनी रेड चिलीज व यूटीव्हीची भागीदारी आहे.

शाहरुखकडून काही पैसा त्याचे मित्र करीम मोरानी यांनी लावला आहे. मीडियातून चित्रपटाचे बजेट 75 कोटी असल्याचे सांगण्यात येत आहे. हा दावा खरा मानला तरी नायक म्हणून शाहरुखला त्याची फीस मिळेल; परंतु निर्माता म्हणून तो चित्रपटातून आपल्या फीसहून किमान 70-75 कोटींहून अधिकची कमाई करेल. एकूण मिळून ही रक्कम सुमारे 100 कोटी रुपयांच्या आसपास जाऊ शकेल, असा अंदाज आहे. चित्रपटाच्या एकूण उत्पन्नातून वितरक, सिनेमा हॉलचे मालक यांचा हिस्सा वगळला तरी चित्रपटाचा एकूण नफा 175 ते 190 कोटींच्या आसपास राहील, असा अंदाज चित्रपट विश्लेषकांनी लावला आहे. भारतीय बाजारपेठेचा विचार केल्यास चेन्नई एक्स्प्रेसला आमिर खानच्या थ्री इडिएट्सचा विक्रम मोडणे आणखी बाकी आहे. थ्री इडिएट्सच्या नावावर (देशात) 218 कोटी रुपये उत्पन्नाचा विक्रम आहे.

अब तक 200
चेन्नई एक्स्प्रेस प्रेक्षकांच्या पसंतीला उतरल्याने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत या चित्रपटाने भारतातील बाजारपेठेत 200 कोटींचा पल्ला गाठला आहे. त्याशिवाय अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, न्यूझीलंडसह आखाती देशांतील बॉक्स ऑफिसवर चित्रपट 100 कोटींवर पोहोचला आहे.

290 कोटींचा निव्वळ नफा : यूटीव्हीने अगोदरच चेन्नई एक्स्प्रेसचे सॅटेलाइट हक्क झी ग्रुपच्या चित्रपटविषयक नवीन वाहिनीला विकले आहेत. ते 41 कोटींना विकण्यात आले आहेत. चित्रपटात दाखवण्यात आलेले ब्रँड इत्यादींमधून 30 कोटी अतिरिक्त कमाई झाली आहे. त्यात मोबाइल रिंगटोन, संगीत इत्यादीतून मिळणारे उत्पन्न सोडले तरी चेन्नई एक्स्प्रेस कमाईत तुफान एक्स्प्रेस ठरल्याचे दिसते. कारण एकूण उत्पन्नात चित्रपट 365 कोटींवर पोहोचला आहे. त्यातून 75 कोटी एवढा निर्मिती खर्च वगळला तरी उत्पन्न 290 कोटींचा निव्वळ नफा झाल्याचे स्पष्ट होते.