आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शाही इमाम बुखारीकडून मोदी सरकारचे कौतूक, म्हणाले- झाकीर दोषी असेल तर कारवाई करा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शाही इमाम अहमद शाह बुखारी - Divya Marathi
शाही इमाम अहमद शाह बुखारी
नवी दिल्ली - जामा मशिदीचे शाही इमाम सैय्यद अहमद बुखारींनी दहशतवदाविरोधात मोदी सरकारने केलेल्या उपाययोजनांचे स्वागत केले आहे. त्यासोबतच वादग्रस्त मुंबईचे इस्लाम प्रचारक झाकीर नाईक यांच्या संदर्भात विचारलेल्या एका प्रश्नावर बुखारी म्हणाले- कोणताही धर्मगुरु किंवा स्कॉलर निरपराधांच्या हत्येचे समर्थन करु शकत नाही. dainikbhasker.com सोबतच्या बातचीतमध्ये बुखारींनी अनेक प्रश्नांची सविस्तर उत्तरे दिली.

ते म्हणाले, 'दहशतवादासंदर्भात विद्यमान सरकारची पाऊले योग्य पडताना दिसत आहे. मागील सरकारच्या काळात दहशतवादाच्या आरोपात पकडले गेलेले निरपराध मुस्लिम तरुण अजूनही तुरुंगात अडकले आहेत. या सरकारने त्यातील जे निरपराध आहेत त्यांना सोडून दिले आहे.'

दिल्ली आणि हैदराबाद येथील घटनांचा उल्लेख करुन बुखारी म्हणाले, 'ताज्या दोन घटनांमध्ये सरकारने चांगले काम केले आहे. दिल्ली आणि हैदराबाद येथे दहशतवादाच्या आरोपात पकडलेल्या बऱ्याच तरुणांना चौकशीनंतर सोडून दिली आहे.'

यूपीए सरकाच्या काळात मुस्लिम तरुणांना चुकीच्या पद्धतीने अटक होत होती का, या प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले, तुम्हीच पाहा ना ! यूपीएच्या काळात पकडलेले हजारो निरपराध तरुण आजही तुरुंगात आहेत. अनेकांना न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर सोडण्यात आले. त्यासोबतच यूपीए सरकारचे वकील निरपराध तरुणांच्या सुटकेला कोर्टात मोठा विरोध करत होते. त्यामुळे त्यांची सुटका होण्याचा मार्ग आणखी कठीण होऊन जात होता.

मुस्लिम धर्मप्रचारक झाकीर नाईक यांच्यावर झालेल्या आरोपाबद्दल विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बुखारी म्हणाले, 'मी आताच त्यांच्या भाषणाचे काही व्हिडिओ पाहिले. त्यात काहीही चुकीचे वाटले नाही. दुसरे असे, की कोणताही धर्मगुरु किंवा प्रचारक हा दहशतवादाला योग्य ठरवू शकत नाही.'

मात्र बांगलादेशात हल्ला करणारे आणि हैदराबादमध्ये पकडले गेलेले आयएसआयएस समर्थक हे झाकीरच्या भाषणाने प्रभावित होते, आणि ते त्यांचे भाषण ऐकत होते. यावर बुखारी म्हणाले, मी सर्व ऑडिओ आणि व्हिडिओ पाहिलेले नाही. जर त्याने काही चुकीचे केले असेल तर सरकार आपले काम करेल. कायदा सर्वोच्च आहे. निरपराधांच्या कत्तलीला कोणीच योग्य ठरवणार नाही.
पुढील स्लाइडमध्ये वाचा, कोण आहे झाकीर नाईक
बातम्या आणखी आहेत...