आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shahrukh And Aishwarya To Meet French President Francois Hollande

R\'DAY:फान्सच्या अध्यक्षांसोबत ऐश्वर्याचे लंच, दिग्गज सेलेब्सही झाले सहभागी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- 67 व्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडनंतर मंगळवारी फ्रान्सचे अध्यक्ष फ्रांस्वा ओलांद यांनी निवडक लोकांसोबत लंचचा आस्वाद घेतला. यात बॉलिवूडची आघाडीचे अभिनेत्री ऐश्वर्या राय- बच्चन व सुहैल सेठसारखे दिग्गज सहभागी झाले. राष्ट्रपती भवनात प्रणव मुखर्जी यांनी सायंकाळी मेजवाणी देण्यात आली. ओलांद यांना सन्मानार्थ या मेजवाणीचे आयोजन करण्‍यात आले होते. मेजवानीला आलेल्या पाहुण्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्यासाठी एकच गर्दी केली.

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख, ऐश्वर्या राय- बच्चन व निर्माता आदित्य चोप्राने फ्रांसचे अध्यक्ष फ्रांस्वा ओलांद यांची भेट घेतली. ओलांद यांच्यासोबत लंचचे अनेक सेलब्सला इन्व्हिटेशन मिळाले आहे. फ्रेंच वंशाची अॅक्ट्रेस कल्कि कोचलिनला देखील लंचला इनव्हाइट करण्यात आले आहे.

कोणी ऑर्गनाइज केली पार्टी?
- फ्रांसचे राजदूत रिशिए यांनी दिल्लीत एका खासगी पार्टीचे आयोजन केले आहे.
- लंचदरम्यान फ्रांस्वा ओलांद बॉलिवुड आर्टिस्ट्ससोबत चर्चा करणार आहेत.
- बॉलिवूडमधील काही दिग्गज सेलिब्रिटीजला ओलांद यांच्यासोबत लंचसाठी इनवाइट करण्‍यात आले आहे.

- राष्‍ट्रपती प्रणव मुखर्जी व पंतप्रधान मोदी यांच्यासह उपराष्‍ट्रपती हामिद अन्सारी, भाजपचे ज्येष्‍ठ नेते लालकृष्ण अडवाणी, कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, दिल्लीचे उपराज्यपाल नजीब जंग यांचा समावेश होता.

सर्वोच्च सिव्हिलियन अवॉर्डने शाहरुख सन्मानित
- फ्रांस्वा ओलांद तीन दिवसीय भारतीय दौर्‍यावर आले आहेत. आज दौर्‍याचा अंतिम दिवस आहे. सायंकाळी पाच वाजता ते मायदेशी रवाना होणार आहे. राजपथावर झालेल्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
- ऐश्वर्या राय-बच्चन मागील काही वर्षांपासून फ्रान्समध्ये होणार्‍या कांस फिल्म फेस्टिवलमध्ये सहभागी होत आहे.
- ऐश्वर्याला 2012 मध्ये फ्रान्स ने 'नाइट ऑफ द ऑर्डर ऑफ आर्ट्स अॅण्ड लेटर्स' पुरस्काराने सन्मानित केले होते.
- फ्रेंच गव्हर्नमेंटने शाहरुख खानला 2007मध्ये ऑर्डर ऑफ आर्ट्स अॅण्ड लेटर्स अवॉर्ड दिला होता.
- 2014 मध्ये सर्वोच्च समजला जाणारा 'फ्रेंच सिव्हिलियन अवॉर्ड 'लीजन डी ऑनर'ने शाहरुखला सन्मानित करण्‍यात आले होते.

पुढील स्लाइडवर पाहा, संबंधित फोटो...