आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'आप\'ला दुसरा धक्का : किरण बेदींच्या पाठोपाठ शाजिया इल्मींचा भाजपमध्ये अधिकृतरित्या प्रवेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - शाजिया इल्मी यांचे स्वागत करताना सतीष उपाध्याय.
नवी दिल्ली - देशातील पहिल्या आयपीएस अधिकारी किरण बेदी यांनी गुरुवारी भाजपमध्ये प्रवेश करत आपला मोठा धक्का दिला होता. त्यापाठोपाठ आता पूर्वाश्रमीच्या आप नेत्या शाजिया इल्मी यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे.त्यामुळे आपला दोन दिवसांत दोन धक्के बसले आहेत. दिल्ली भाजपचे प्रदेशाध्यक्ष सतीष उपाध्याय यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तसेच संगीतकार आणि दिग्दर्शक आनंद राज आनंद यांनीही यावेळी भाजपमध्ये प्रवेश केला.
शाजिया इल्मी यांनी शुक्रवारी भाजपाध्यक्ष अमित शाह यांची भेट घेतली. अमित शाह यांनी पक्षात माझे स्वागत केले आणि मी लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे या भेटीनंतर शाजिया यांनी ट्वीट केले. भाजपचे नेते अश्विनी उपाध्याय यांनीही शाजिया दुपारी तीन वाजता पक्षात प्रवेश करणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार शाजिया यांनी पक्षप्रवेश केला.
देशातील पहिल्या आयपीएस अधिकारी किरण बेदी यांनी गुरुवारी भाजपमध्ये प्रवेश करत आपला मोठा धक्का दिला होता. त्यापाठोपाठ आता पूर्वाश्रमीच्या आप नेत्या शाजिया इल्मी यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे आपला दोन दिवसांत दोन धक्के बसले आहेत.
शाजियांच्या भाजप प्रवेशाबाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. त्यात शाजिया केजरीवाल यांच्याच विरोधात मैदानात उतरणार असल्याच्या बातम्यांनी अधिक खळबळ उडाली होती. पण आपण अध्याप कोणताही विचार केला नसल्याचे शाजिया इल्मी यांनी दोन दिवसांपूर्वीच ट्वीटद्वारे सांगितले होते. त्याचप्रमाणे भाजपमध्ये प्रवेशाबाबतही अंतिम निर्णय घेतला नसल्यायचे इल्मी म्हणाल्या होत्या.
शाजिया इल्मी यांचा गेल्या विधानसभा निवडणुकीत अवघ्या काही मतांनी पराभव झाला होता. त्यातही त्यांच्या भावानेच त्यांच्या विरोधात प्रचार करून निवडणूक लढवल्याने त्यांचा पराभव झाला होता.