आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1 हजारची नवी नोट नाही, 500 च्या नोटांत वाढ, अर्थसचिव शक्तिकांत दास

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- गेल्या ८ नोव्हेंबर रोजी बंद करण्यात आलेल्या १ हजार रुपयांच्या नोटा नव्याने चलनात आणण्याची तूर्त कोणतीही योजना नसल्याचे अार्थिक विभागाचे सचिव शक्तिकांत दास यांनी म्हटले आहे. आगामी काळात ५०० आणि त्यापेक्षा कमी मूल्याच्या नोटांचा पुरवठा वाढवण्यावरच लक्ष असेल, असेही त्यांनी ट्विटरवर विविध पोस्टच्या माध्यमातून नमूद केले आहे.
 
नोटाबंदीनंतर देशभर सध्या रोख रकमेबाबतची स्थिती सुधारली असली तरी अजूनही काही भागांत अडचण आहे. तो प्रश्न सोडवण्यासाठी कमी मूल्याच्या नोटांची संख्या वाढवण्यावरच सरकारचा भर असेल, असे दास यांनी म्हटले आहे. जनतेला पुरेशी रक्कम सहजपणे उपलब्ध व्हावी, याकडे सध्या विशेष लक्ष दिले जात असल्याचे नमूद करून अजूनही अनेक एटीएम नोटाविना रिकामे असल्याच्या तक्रारी येत आहेत.
 
या तक्रारी दूर करून लोकांना दिलासा देण्याचा प्रयत्न असल्याचे दास यांनी नमूद केले. गेल्या आठवड्यात अर्थमंत्री अरुण जेटली यांनी नोटाबंदीनंतर बाजारात चलनी नोटा पुरेशा उपलब्ध झाल्या असल्याचे सांगून रिझर्व्ह बँक नोटांच्या या पुरवठ्यावर रोज लक्ष ठेवून असल्याचे म्हटले होते. मात्र, अजूनही प्रत्यक्षात अनेक ठिकाणी ५०० व १०० रुपयांच्या नोटांचा तुडवडा जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर दास यांनी हे ट्विट केले आहेत.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...