हरिद्वार - साई पुजेचा विरोध करणारे द्वारका और ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांच्या नेतृत्वात रविवारी झालेल्या संत समाजाच्या बैठकीत केंद्रिय जल संपदा मंत्री उमा भारती यांच्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. उमा भारती यांनी शंकराचार्यांची माफी मागायला हवी असे मत संतांनी मांडले. तसेच सर्व संतांनी एकत्रितपणे नरेंद्र मोदी यांनी उमा भारती यांना पदावरून हटवावे अशी मागणीही केली आहे.
उमा भारती यांनी शनिवारी आपण साईबाबांची पुजा करत असल्याचे सांगितले होते. त्यांच्या या वक्तव्याने संतांमध्ये तीव्र नाराजी आहे. शंकराचार्यांनी तर साई बाबांच्या पुजा करणा-या उमा भारती या रामभक्त असूच शकत नाही, असेही वक्तव्य केले. शंकराचार्यांच्या मते, 'प्रभू रामही उमा यांच्यावर नाराज आङेत. उमा भारती यांनी जनतेचे नेता म्हणून निवडले आहे. त्यांनी धार्मिक बाबींमध्ये पडायला नको. त्या मंत्री आहेत देव नाही, अशा शब्दांत शंकराचार्यांनी उमा यांना फटकारले होते.
उमा भारती भूमिकेवर ठाम
उमा भारती यांनी रविवारी सायंकाळी शंकराचार्यांना पाठवलेल्या फॅक्समध्ये आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचे स्पष्ट केले आहे. स्वरूपानंद सरस्वती म्हणाले की, 'उमा भारती पत्राद्वारे स्पष्टीकरण देत आहेत. पण केवळ पत्राने काम भागणार नाही. तर उमा भारती यांना स्वतःला हजर रहावे लागणार आहे. त्या रामभक्त आहेत की, साईभक्त हे त्यांना स्पष्ट करावे लागेल. तसेच येथील मंदिरांमध्ये साईबाबांच्या मूर्ती ठेवणे त्यांना बंद करावे लागले, असेही शंकराचार्य म्हणाले आहेत.
गंगा अभियानाबाबत सल्ला
रविवारी सायंकाळी उशीरा शंकराचार्यांनी कनखल येथील आश्रमात भारत साधु समाजाच्या केंद्रिय कार्यसमितिची बैठक बोलावली होती. बैठकीत संतांनी उमा यांच्या वक्तव्याचा निषेध केला. उमा भारतींनी हाती घेतलेल्या गंगा अभियानाबाबतही शंकराचार्यांनी त्यांना सल्ला दिला. जोपर्यंत गंगेचे पाणी विविध ठिकाणी अडवले जाईल तोपर्यंत ती अविरत वहाणे शक्य नाही. त्यामुळे आधी बंधारे बांधणे बंद करावे लागली असे शंकराचार्यांनी म्हटले आहे.
विरोधामुळे भडकले शंकराचार्य
शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांनी त्यांच्या विरोधात होणा-या विरोधावरही तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, 'साई बाबा मुस्लिम फकीर होते. त्यांची तुलना हिंदु देवांबरोबर केली जाऊ शकत नाही. तसेच त्यांची देवांप्रमाणे पुजाही केली जाऊ शकत नाही. काही शक्ती हिंदु धर्माचा विनाश करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी माझे पुतळे जाळले किंवा मला तुरुंगात पाठवले तरीही हिंदु धर्माचे रक्षण करण्याचे माझे काम सुरुच राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
फाईल फोटो : द्वारका आणि ज्योतिष पीठाचे शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती आणि केंद्रिय जल संपदा मंत्री उमा भारती साईंबाबांच्या मुद्यावर आमने सामने आले आहेत.