आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीश्वर अहमद पटेलांचा हिशेब चुकता करणार होते, मात्र ते विजयी झाले - वाघेला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाघेलांनी अहमद पटेल चांगले व्यक्ती असल्याचे सांगत त्यांचे अभिनंदन केले. - Divya Marathi
वाघेलांनी अहमद पटेल चांगले व्यक्ती असल्याचे सांगत त्यांचे अभिनंदन केले.
अहमदाबाद - काँग्रेसला नुकताच रामराम ठोकलेले शंकरसिंह वाघेला यांनी गुजरातमधून अटीतटीच्या लढतीत विजयी झालेल्या अहमद पटेल यांचे अभिनंदन केले आहे. वाघेला गुरुवारी म्हणाले की अहमदभाई शुभेच्छा, एकदम सोबर व्यक्ती आहे. दिल्लीवाले त्यांचा हिशेब चुकता करणार होते, मात्र त्यांनी विजय मिळवला. 8 ऑगस्टच्या रात्री चाललेल्या हाय होल्टेज ड्रामानंतर अहमद पटेल यांनी राज्यसभा निवडणूक जिंकली होती. राज्यसभा निवडणूक निकालानंतर काँग्रेसने क्रॉस व्होटिंग करणाऱ्या वाघेलांसह 8 आमदारांना 6 वर्षांसाठी पक्षातून निलंबित केले आहे. विशेष म्हणजे वाघेला यांनी 22 जुलै रोजीच काँग्रेस सोडत असल्याची घोषणा केली होती. 
 
- वाघेला म्हणाले, 'निवडणूक आयोगाचा यात काहीही रोल नव्हता, त्यांनी हस्तक्षेप करण्याची गरज नव्हती. रिटर्निंग ऑफिसरला निर्णय घेण्याचा कोणताही अधिकार नव्हता.'
- वाघेला म्हणाले, 'पटेल मतांनी विजयी झाले नाही तर, काँग्रेसच्या षडयंत्राने ते जिंकले आहेत. मत रद्द करण्याचे काँग्रेसने आधीपासून ठरविले होते. दिल्लीवाल्यांनी पटेलांना फसवण्याचा पूरेपूर प्रयत्न केला होता, ते त्यांचा हिशेबच चुकता करणार होते, मात्र ते विजयी झाले. चांगली गोष्ट आहे.'
 
आयोगाने सर्व आमदारांचे व्हिडिओ पाहावे
- वाघेला म्हणाले, निवडणूक आयोगाने त्या दिवसाचे (8 ऑगस्ट) सर्व आमदारांचे व्हिडिओ पाहिले पाहिजे. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसते की एजंट जाणिवपूर्वक उभा राहिला होता. 
- दोन आमदारांनी भाजपला मतदान केले होते. हे जर काँग्रेसचे षडयंत्र नसते तर पटेलाचा विजय झालाच नसता.
बातम्या आणखी आहेत...