आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्रतस्थ शरदरावांची पाच दशकांची राजकीय साधना, पंतप्रधानांचे गौरवोद्गार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कार्यक्रमाला उपस्‍थ‍ित असलेले मान्‍यवर. - Divya Marathi
कार्यक्रमाला उपस्‍थ‍ित असलेले मान्‍यवर.
नवी दिल्ली - बारामतीपासून दिल्लीपर्यंत शरद पवारांच्या विकासकार्याचा सुगंध दरवळतो आहे. त्यांची ही पाच दशकांची व्रतस्थ साधना आहे. ते ज्या दिशेला नजर टाकतील तिकडून त्यांना सलामच केला जाईल. त्यांचे रचनात्मक कार्य प्रत्येकासाठी प्रेरणादायीआहे, असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. शरद पवारांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्यात ते गुरुवारी बोलत होते.
शरद पवार यांच्या अमृत महोत्सव सोहळ्याचे विज्ञान भवनात आयोजन करण्यात आले होते. साेहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल, जम्मू- काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला, समाजवादी पार्टीचे अध्यक्ष मुलायमिसंह यादव, राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव, माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी व्यासपीठावर उपस्थित होते. या वेळी शरद पवार यांचा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते, तर प्रतिभा पवार यांचा सोनिया गांधी यांच्या हस्ते सत्कार करण्यात अाला. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शरद पवारांवरील तीन पुस्तकांचे प्रकाशन करून त्याची पहिली प्रत राष्ट्रपतींना भेट देण्यात आली. नरेंद्र मोदी आपल्या भाषणात म्हणाले, सहकार आणि राजकारण या दोघांचीही उत्तमरीत्या सांगड घालत शरद पवार यशस्वी झाले आहे. त्यांची प्रशासकीय पकड उत्तम असल्याने आणि मुंबईतून अंडरवर्ल्डला घालवण्याचे कार्य त्यांच्या हातून घडले आहे. कामाप्रती त्यांची बांधिलकी असल्याने त्यांच्याकडून सातत्याने विकास कामे झाली. दरम्यान, कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रफुल्ल पटेल, तर आभार प्रदर्शन सुप्रिया सुळे यांनी केले.महाराष्ट्रातून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वच आमदार, राज्यातील कार्यकर्ते आणि पत्रकारांना आमंत्रित करण्यात आले होते. राष्ट्रवादी सुमारे ८०० कार्यकर्ते राज्यातून येथे आले होते.
संसदेचे कामकाज चालत नसल्याची खंत : पवार
शरद पवार यांनी संसदेचे कामकाज चालत नसल्याची खंत व्यक्त केली. लोकांनी आपल्याला निवडून पाठवले. मग संसदेचे कामकाज व्हायलाच पाहिजे. सरकार अनुभवी नसेल तर विरोधकांनी सहकार्याची भूमिका ठेवावी. मात्र, सामान्य नागरिकांचे प्रश्न मार्गी लावावेत. ४९ वर्षाच्या संसदीय जीवनात कधीही सभापतींच्या आसनापुढे गेलो नाही. सातत्याने विकासकामांचा ध्यास घेतला. त्यात किती यशस्वी झालो हे सांगता येत नाही; परंतु माझ्यातील उणिवा सातत्याने दूर सारत गेलो. लोकांनी आजवर दिलेल्या प्रेमाबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
विविध पक्षांतील नेत्यांची हजेरी
प्रेक्षकांमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वसुंधराराजे शिदे, वित्तमंत्री अरुण जेटली, संसदीय कार्य मंत्री व्यंकय्या नायडू, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, गुलाम नबी आझाद, रेल्वे मंत्री सुरेश प्रभू, जया बच्चन, शबाना आझमी, विजय मल्ल्या, उद्योगपती राहुल बजाज, अशोक चव्हाण, रामदास आठवले, उमर अब्दुल्ला, काँग्रेसचे वीरप्पा मोईली, मंत्री रविशंकर प्रसाद, अहमद पटेल यांच्यासह दोनशेवर मान्यवर उपस्थित होते.
पुढील स्‍लाइडवर वाचा, कोण काय म्‍हणाले ?