आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वातंत्र्यवीर सावरकर गोहत्येच्या विरोधात नव्हते, सरसकट बंदीची मागणी चुकीची-पवार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- संपूर्ण देशात गोहत्या बंदी घालणे चुकीचे असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांना निशाणा साधला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर गोहत्येच्या विरोधात नव्हते. गोमांस खाणार्‍यांनाही सावरकर दोषी समजत नव्हते, असा दाखलाही पवारांनी यावेळी दिला आहे.

उपयुक्तता संपुष्ठात आलेल्या गायीची हत्या करून गोमांस खाणार्‍यांना मी दोषी समजत नाही, असे सावरकरांनी म्हटल्याचे पवार यांनी सांगितले. गाय हा उपयुक्त प्राणी आहे. उपयुक्तता असेपर्यंत तिचा सांभाळ करणे शेतकर्‍याला शक्य असते. पण, उपयुक्तता संपुष्ठात आल्यानंतर ती शेतकर्‍याला ओझं होत असते, असेही पवार यांनी सांगितले आहे.

दिल्लीतील नॅशलनल म्युझियममध्ये काल (मंगळवारी) शरद पवार यांचे आत्मचरित्र 'अपनी शर्तों पर'चे (हिंदी आवृत्ती) प्रकाशन झाले. या कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांनी भागवत यांच्या गोहत्या बंदीच्या मागणीला स्पष्ट विरोध केला आहे.

भागवतांनी केली सरसकट गोहत्या बंदीची मागणी...
संपूर्ण देशात गोहत्येला विरोध करणारा कठोर कायदा व्हायला हवा, अशी मागणी मोहन भागवत यांनी केली आहे. तसेच गायींचे संरक्षण करताना कायदाचे उल्लंघन होता कामा नये, असेही भागवत यांनी गोरक्षक समुहाला सल्ला दिला आहे. दिल्लीत रविवारी महावीर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात भागवत बोलत होते.
बातम्या आणखी आहेत...