आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऊस दर आणि एफआरपीवर शरद पवारांनी घेतली नरेंद्र मोदींची भेट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज (सोमवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी पवारांसोबत राष्ट्रवादीचे शिष्टमंडळ उपस्थित होते. या दरम्यान शेतीच्या इतर प्रश्नांवरही चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे.
ऊस उत्पादकांना एफआयपीप्रमाणे दर देण्यासाठी 850 रुपये सबसिडी द्यावी, शेतकऱ्यांच्या कर्जाची पर्नरचना करावी आदी मागण्यांबाबत शरद पवार यांनी आज नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. साखरेचा भाव निश्चित करुन बफर स्टॉक तयार करण्यात यावा, असेही यावेळी पवारांनी केंद्राला सुचविले.
आमच्या मागण्यांबाबत नरेंद्र मोदी यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली, असे यानंतर पवार यांनी सांगितले. आम्ही सोबत मिळून समस्यांवर तोडगा काढू, असेही त्यांनी सांगितले.