आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नोटबंदीवर पवारांची टीका - ऑपरेशन नंतर पेशंट ह्यात आहे की नाही हे पाहाण्यास सरकार विसरले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - मोदी सरकारने घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी स्वागत केले असले तरी या निर्णयाची पूर्वतयारी करण्यात सरकार अपयशी ठरले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ऑपरेशन झाले पण पेशंट ह्यात आहे की नाही हे काही दिवसांनी कळेल, अशी बोचरी टीका त्यांनी नोटबंदीवर केली आहे. एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पवारांनी केंद्र सरकारने जिल्हा सहकारी बँकांवर दाखविलेल्या अविश्वासाबद्दलही नाराजी व्यक्त केली.
काय म्हणाले पवार
- 500-1000 च्या नोटा बंद करण्याचा निर्णय जाहीर करताना पंतप्रधान मोदींनी त्यासाठी दिलेल्या कारणांबद्दल कोणाचेही दुमत असण्याचे कारण नाही.
- ऑपरेशन यशस्वी झाले असले तरी ऑपरेशन नंतर पेशंटची ज्या पद्धतीने काळजी घेण्याची गरज आहे, ती घेतलेली दिसली नाही. सरकारी पातळीवर नियोजनाचा आभाव दिसला आहे. पेशंट ह्यात आहे की नाही हे काही दिवसांनी कळेल.
जिल्हा बँकाबाबत सरकारचा दुजाभाव
- जिल्हा सहकारी बँकांबाबत केंद्र सरकारने दुजाभाव करत असल्याचा आरोप केला. एकीकडे अर्बन बँकांना व्यवहार करण्याची मुभा देण्यात आली मात्र आरबीआय ज्यांचे ऑडिट करते, नाबार्डचे ज्यांच्यावर नियंत्रण आहे, अशा जिल्हा बँकाबद्दल अविश्वास का दाखवता ? असा सवाल पवारांनी उपस्थित केला.
- नोटबंदीनंतर केंद्र सरकारकडून वेगवेगळे नोटीफिकेशन गेल्या 15 दिवसांमध्ये आले, याचा अर्थच हा होता की सरकारची तयारी नव्हती. कोणकोणत्या अडचणी येतील याची माहितीच सरकारला नव्हती.
सरकारने गुप्ततेचा बाऊ केला
- 500 रुपयांच्या नोटा बदलण्यापूर्वी एटीएम बदलता आले असते. त्यांची साइज आधीच सांगून ठेवली असती तर काहीही बिघडले नसते. त्यासाठी दिलेले गुप्ततेचे कारण पटत नसल्याचे पवार म्हणाले. कारण, नोटांचे डिझाइन बदलत राहाते, हे त्यातील तज्ज्ञांनी सांगितले आहे. देशात अनेकदा नोटांचे डिझाइन बदलेल आहे आणि त्या बदललेल्या नोटा आरबीआयच्या आदेशानंतरच फॅक्ट्रीबाहेर पडतात. त्यामुळे गुप्ततेचे कारण पटत नाही.
- नाशिक सेक्युरिटी प्रेसमधील काही लोकांशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी सांगितले की गेल्या दोन महिन्यांपासून आमचे प्रॉडक्शन थांबलेले होते. आम्हाला सांगितले गेले की नवीन चलन येत आहे. गव्हर्नर बदलल्यानंतर त्यांच्या सहीचा प्रश्न निर्माण होतो, त्यामुळे प्रॉडक्शन थांबवले जाते, असे आम्हाला वाटले होते.
नोटबंदीचा लोकांमध्ये राग
- नोटबंदीच्या नियोजनाबद्दल लोकांमध्ये राग आहे, असे पवार म्हणाले. हा राग सरकारसाठी अडचणीचा ठेरल, असेही पवार म्हणाले.
- पवार म्हणाले, परिस्थिती किती दिवसांमध्ये, महिन्यांमध्ये नियंत्रणात येते यावर हे अवलंबून आहे. राजकारणात सरकारला प्रत्येक निर्णयाचे बरे-वाईट परिणाम भोगावे लागतातच, हे सांगण्यासही विविध सरकारांमध्ये 12 वर्षे केंद्रीय मंत्री राहिलेले पवार सांगण्यास विसरले नाही.
- लोकसभा आणि राज्यसभेत मोदी हजर होत नाही यावरही पवारांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, पंतप्रधान देशाला उद्देशून भाषण करतात. तेव्हा या निर्णयाबद्दल लोकांचे प्रतिनिधी काही प्रश्न विचारत असतील तर त्याचे उत्तरही पंतप्रधानांनी देणे आपेक्षित आहे.
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...