आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरद पवार येऊ न शकल्याने दिल्लीतील आघाडीची उच्चस्तरीय बैठक रद्द

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- राष्‍ट्रवादी कॉँग्रेस आणि कॉँग्रेसमधील जागावाटपाबाबत दिल्लीत होणारी उच्चस्तरीय नेत्यांची बैठक आज शरद पवार येऊ न शकल्याने रद्द करण्यात आली. ही बैठक उद्या बुधवारी शरद पवार यांच्या 6, जनपथ येथील निवासस्थानी होणार आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाबाबतचा या दोन्ही पक्षाचा तिढा अद्याप सुटायचा आहे. दि. 7 ऑगस्ट रोजी दोन्ही पक्षातील नेत्यांची पवार यांच्या निवास्थानी पहिली दीर्घ बैठक झाली होती. तर राष्‍ट्रवादी कॉँग्रेस दि. 20 ऑगस्टपर्यंत उमेदवारांची पहिली यादी जाहीर करेल असे राष्‍ट्रवादीचे नेते खा. प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले होते. परंतु राष्‍ट्रवादीला वाढवून पाहिजे असलेल्या जागांवर सहमती होऊ न शकल्याने उमेदवरांच्या नावांची घोषणा करणे दोन्ही पक्षाला अवघड झाले आहे. आज शरद पवार यांच्या निवासस्थानी अहमद पटेल आणि ए.के.अ‍ॅन्टोनी यांच्यासोबत बैठक होणार होती. परंतु शरद पवार हे मुंबईहून येऊ न शकल्याने आजची बैठक उद्यावर ढकलण्यात आलेली आहे.
या बैठकीत राष्‍ट्रवादी कॉँग्रेस काही जागा बदलवून मागणार आहे. तर 2009 च्या तुलनेत अधिक जागांवर राष्‍ट्रवादीने दावा केलेला आहे. याच महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आचारसंहिता लागणार असल्याने शक्य तेवढ्या लवकर जागांच्या वाटाघाटीबाबत तोडगा काढून उमेदवार जाहीर करण्याचा निर्णय उद्याच्या बैठकीत घेतला जाईल.