आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरद यादव यांची राज्यसभेच्या पक्षनेतेपदावरून गच्छंती, अन्सारी यांच्यावरही निलंबनाची कारवाई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- नितीशकुमार यांच्याविरोधात उघड मोर्चा सुरू करणारे जनता दलाचे (संयुक्त) शरद यादव यांना राज्यसभेच्या पक्षनेतेपदावरून काढण्यात आले आहे. त्यांच्या जागी वरिष्ठ नेते आर. सी. पी. सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  

जदयूच्या राज्यसभेतील सर्व सदस्यांनी सभापती एम. व्यंकय्या नायडू यांची भेट घेऊन त्यांच्याकडे सिंह यांच्या नियुक्तीबाबतचे पत्र सोपवले. सिंह हे नितीशकुमार यांचे विश्वासू मानले जातात. राज्यसभेत जदयूचे दहा सदस्य आहेत. शुक्रवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. त्याशिवाय अली अन्वर अन्सारी यांनाही निलंबित करण्यात आले आहे. त्यांना संसदीय पक्षातून बाहेर करण्यात आले आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी बोलावलेल्या बैठकीला अन्सारी यांनी हजेरी लावली होती. त्यानंतर जदयूने ही कारवाई केली. दरम्यान, नितीशकुमार आणि यादव यांच्यातील मतभेद वाढले असून सध्या यादव बिहारच्या दौऱ्यावर आहेत. 

महाआघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय शरद यादव यांना पसंत पडला नाही. त्यामुळे त्यांनी राज्यात दौरा काढला आहे. ते लालूप्रसाद यादव यांच्या पक्षासोबत सलगी करत आहेत, असा दावा केला जातो. परंतु शरद यादव यांनी मात्र नितीशकुमार यांचा पक्ष सरकारी, तर आपला खरा जदयू असल्याचा दावा केला होता. नितीश कुमार यांनी भाजपसोबत जुळते घेतल्यापासून यादव नाराज होते. 

नितीशकुमारांना आमंत्रण  
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सामील होण्याचे आवाहन केले आहे. त्यासाठी शहा यांनी नितीश यांना आमंत्रण दिले आहे. शुक्रवारी माझी व नितीशकुमार यांची चर्चा झाली. त्यात मी त्यांना आमंत्रण दिल्याची माहिती शहा यांनी पत्रकारांना दिली. आता बिहारमध्ये आम्ही एकत्र आलो आहोत. सरकारमधील या दोन पक्षांतील युती नैसर्गिक आहे, असे शहा यांनी एका प्रश्नावर सांगितले.  
 
हे ही वाचा...
बातम्या आणखी आहेत...