आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shard Pawar Will Be Prime Minister, Nationalist Congress Cleared

शरद पवार यांच्या पंतप्रधानपदाचा पर्याय खुला, राष्ट्रवादी कॉंग्रेसने केले स्पष्‍ट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख व केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या पंतप्रधानपदासाठी परिस्थिती पाहून सर्व पर्याय खुले असल्याचे पक्षाने बुधवारी स्पष्ट केले. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली पवार काम करण्याच्या मुद्दय़ावर वेळ येईल तेव्हा ठरवू, अशी प्रतिक्रिया पक्षाने दिली.
राष्ट्रवादीचे प्रवक्ते डी.पी. त्रिपाठी म्हणाले की, काँग्रेसने पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर केलेला नाही. प्रचार समितीचे प्रमुखपद वेगळे आहे. आधी त्यांचे ठरू द्या, मग आम्ही ठरवू. पवारांबाबत ते म्हणाले की, राष्ट्रीय पक्ष असलो तरी आम्हाला र्मयादा आहेत. दिग्गज नेत्याचा हा लहान पक्ष आहे. आकड्याचा खेळ चालतो. आमच्याकडे आकडा नाही. तथापि, परिस्थितीवर सगळे अवलंबून आहे. पर्याय नेहमीच खुले आहेत. 1967 पासून लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांत जिंकून येणारे पवार हे देशातील एकमेव नेते असल्याचेही त्रिपाठी म्हणाले.
समन्वय समितीची बैठक घ्या
राष्ट्रवादीचा हा दबावतंत्राचा भाग आहे काय यावर ते म्हणाले की, तसे असते तर यूपीएमध्ये बरेच काही चांगले झाले असते. याशिवाय संसदेचे अधिवेशन जवळ येत असल्याने यूपीएच्या समन्वय समितीचीही लवकर बैठक व्हावी, असेही त्यांनी म्हटले आहे.