आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sharda Chit Fund Scam Cbi Questions P Chidambaram's Wife Nalini

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

माजी अर्थमंत्री चिदंबरम यांच्या पत्नीची शारदा चिटफंड घोटाळ्यात चौकशी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - माजी अर्थमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते पी. चिदंबरम यांच्या पत्नी नलिनी चिदंबरम यांची शारदा चिट फंड घोटाळा प्रकरणी सीबीआयने आज (रविवार) चौकशी केली आहे.
काय आहे प्रकरण
पश्चिम बंगालमधील शारदा ग्रुपचा चेअरमन सुदिप्त सेन याने दावा केला होता, की त्याने काँग्रेस नेते मतंगसिंह याची घटस्फोटीत पत्नी मनोरंजना सिंह हिच्या सांगण्यावरुन नलिनी चिदंबरम यांना एक कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम दिली होती. सेनने सीबीआयला कथितरित्या लिहिलेल्या पत्रात आरोप केला आहे, की त्याने नलिनी चिदंबरम यांना कोलकाता येथे येण्या - जाण्यासाठी आणि पंचतारांकित हॉटेलमध्ये राहाण्यासाठी पेमेंट केले होते. सेनेचे म्हणणे आहे, की नलिनी यांनी त्याच्यावर मनोरंजना सिंह यांच्या कंपनीत 42 कोटींची गुंतवणूक करण्यासाठी दबाव टाकला होता.

(छायाचित्र - पी. चिदंबरम यांच्या पत्नी नलिनी. )