आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपच्या विजयाने शेअर बाजारातही तेजीचे संकेत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला यश मिळाल्यामुळे शेअर बाजारात तेजीचे संकेत मिळत आहेत. निवडणूक निकाल शेअर बाजार वधारण्यास महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. आशिका स्टॉक ब्रोकर्सचे रिसर्च हेड पारस बोथरा यांनी सोमवारी शेअर बाजार उघडताच जोरदार ओपनिंग होण्याची शक्यता वर्तवली आहे. तेजी सर्वाधिक पातळीवर पोहोचेल. शेअर बाजारात एवढा मोठा बदल 2014च्या निवडणुकी वेळी होऊ शकतो.
इमाम फायनान्शियलचे वल्लभ भन्साळी म्हणाले, बाजाराला काँग्रेस किंवा भाजपचे सरकार हवे आहे, असा त्याचा अर्थ होत नाही. वास्तवात बाजार स्थिर सरकारच्या बाजूने आहे. आर्थिक सुधारणा पुढे सुरू न राहिल्यामुळे शेअर बाजार सध्याच्या सरकारवर नाराज होता. भाजपने आपल्या नेतृत्वाच्या माध्यमातून स्पष्ट भूमिका घेतली आहे. याला बाजाराचाही पाठिंबा मिळाला आहे. दुसरीकडे, आर्थिक आघाडीचा विचार केल्यास शेअर बाजाराला प्रोत्साहन देणा-या ऑक्टोबर महिन्याच्या औद्योगिक उत्पादन (आयआयपी) आणि नोव्हेंबर महिन्याच्या ग्राहक मूल्य निर्देशांकाची (सीपीआय) आकडेवारी गुरुवारी जाहीर होणार आहे. रिझर्व्ह बँकेच्या 18 डिसेंबर रोजी जाहीर होणा-या पथ धोरणाआधी या आकड्यांच्या प्रदर्शनामुळे बाजारावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो.
ऑगमेंट फायनान्शियल सर्व्हिसेसचे सीईओ गजेद्र नागपाल यांच्या म्हणण्यानुसार, सोमवारी शेअर बाजार उच्च पातळीने खुला होईल. गुुंतवणूकदार सकारात्मक भावनेतून बाजाराकडे पाहत आहेत. उच्च पातळीवर नफा कमावण्यासाठी शेअर विक्रीही होऊ शकते. लोकांना गुजरात मॉडेलच्या धर्तीवर विकासाची आशा बाळगून आहेत.
कोटक सिक्युरिटीजमध्ये प्रायव्हेट क्लायंट ग्रुप रिसर्च प्रमुख दीपेन शाह यांच्या म्हणण्यानुसार, शेअर बाजारातील घडामोडी अमेरिकी आर्थिक आकडेवारी आणि निवडणूक निकालांवर अवलंबून राहतील.