आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘माझ्यावर कशाला? महात्मा गांधी यांच्यावर चित्रपट करा’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आगामी ‘अण्णा’ या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि अभिनेता शशांक उदापूरकर यांच्या म्हणण्यानुसार, दीड वर्षापर्यंत अण्णा हजारे यांच्या जीवनावर संशोधन केल्यानंतर माझ्यात मोठा बदल झाला आहे. हा चित्रपट म्हणजे आपल्या जीवनातील एक बदल, असे ते मानतात. हा चित्रपट का बनवला हे उदापूरकर यांनी ‘दिव्य मराठी’शी झालेल्या चर्चेत सांगितले. त्यांच्याच शब्दांत जाणून घेऊ...
मी इंजिनिअरिंग केले आहे. त्यादरम्यान माझ्या जीवनात जे होत आहे ते माझे ध्येय नाही, असे मला वाटत होते. इंजिनिअरिंग केल्यानंतर मी वडिलांना, ‘यात माझे मन लागत नाही, मला फॅक्टरी काढायची आहे,’ असे सांिगतले. मी चांगले कमावत होतो. आई-वडील खुश होते, पण मी खुश नव्हतो. हे सर्व वडिलांना सांगितले तेव्हा त्यांनी विचारले, ‘तुला काय करायचे आहे?’ मी म्हणालो, ‘मला अभिनेता व्हायचे आहे.’ काही मराठी चित्रपट केले, पण मला जसे करायचे तसे हे चित्रपट नाहीत असे वाटले. त्यानंतर २०११ मध्ये मी अण्णांचा लढा अनुभवला आणि आश्चर्यचकित झालो. मी दीड वर्ष त्यांच्यावर संशोधन केले. माझ्यात एवढा बदल होऊ शकतो तर ते पाहिल्यानंतर देशात किती बदल होईल असा विचार लिहिताना मनात आला. मी अण्णांकडे गेलो आणि त्यांच्यावर चित्रपट तयार करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावर ते म्हणाले, ‘माझ्यावर का? चित्रपट बनवायचाच असेल तर गांधीजींवर बनवा.’ पण नंतर त्यांनी आपली सहमती दिली.
बातम्या आणखी आहेत...