आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डोकलाम वाद मिटवण्यासाठी PMO-परराष्ट्र मंत्रालयाचे काँग्रेस नेते थरुर यांनी केले अभिनंदन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काँग्रेस खासदार शशी थरुर यांनी पंतप्रधान कार्यालय आणि परराष्ट्र मंत्रालयाचे अभिनंदन केले. - Divya Marathi
काँग्रेस खासदार शशी थरुर यांनी पंतप्रधान कार्यालय आणि परराष्ट्र मंत्रालयाचे अभिनंदन केले.
नवी दिल्ली - डोकलाम वादावर 72 दिवसानंतर तोडगा निघाल्याने काँग्रेस नेते शशी थरुर यांनी भारत सरकारचे अभिनंदन केले आहे. थरुर म्हणाले, 'पंतप्रधान कार्यालयाच्या नेतृत्वात परराष्ट्र मंत्रालयाने या वादावर ज्या प्रकारे तोडगा काढला आहे त्यासाठी ते अभिनंदनास पात्र आहेत.' दुसरीकडे भाजप नेते राम माधव म्हणाले, या वादामुळे निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीची किंमत दोन्ही देशांना मोजावी लागली असती. या प्रकरणावर नौदल प्रमुखांचेही वक्तव्य आले आहे. ते म्हणाले, 'चीनच्या तुलनेत सोशल मीडियाचा वापर आपण अधिक परिणामकारक केला.'
 
 आणखी काय म्हणाले थरुर 
 - शशी थरुर यांनी पंतप्रधानांचे स्पष्ट शब्दात कौतूक केले. ते म्हणाले, 'चीनला डोकलाम भागातून माघारी जाण्यास आणि तिथे पुन्हा पहिल्यासारखी परिस्थिती निर्माण करण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाने ज्या डिप्लोमॅसीचा वापर केला त्यासाठी त्यांचे कौतूक केले पाहिजे.'
बातम्या आणखी आहेत...