आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shashi Tharoor Questioned In Sunanda Pushkar Case News In Marathi

सुनंदा पुष्कर मृत्युप्रकरण: ‍मुलगा शिव मेमन पाठोपाठ शशी थरूर यांची पुन्हा चौकशी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- सुनंदा पुष्कर यांचे मृत्युप्रकरण एक रहस्य बनत चालले आहे. कॉंग्रेसचे खासदार शशी थरूर यांना आज (गुरुवारी) पुन्हा एकदा दिल्ली पोलिसांच्या विशेष चौकशी समितीला (एसआयटी) सामोरे जावे लागले. गेल्या आठवड्यात सुनंदा पुष्कर यांचा मुलगा शिव मेनन याला चौकशीसाठी बोलवण्यात आले होते.

दक्षिण दिल्लीतील वसंत कुंज येथील एसआयटीच्या कार्यालयात थरुर यांना दुसर्‍यांदा बोलवले होते. दिल्ली पोलिसांच्या अनेक प्रश्नांना थरुर यांने स्पष्टीकरण द‍िल्याची माहिती मिळाली आहे. यापूर्वी 19 जानेवारीला पोलिसांनी थरूर यांची चौकशी केली होती. तसेच सुनंदा यांचा मुलगा शिव मेनन याची 5 फेब्रुवारीला चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. शिव मेनन याला थरुर आणि सुनंदा यांच्यात असलेल्या नात्यासंदर्भात चौकशी करण्‍यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

थरुर यांच्याकडून अधिक माहिती मिळते काय? हे पाहाण्यासाठी त्यांना चौकशीसाठी पुन्हा एकदा बोलवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. तसेच आतापर्यंत पोलिसांच्या विशेष चौकशी समितीने 15 लोकांची चौकशी केली. यात थरूर, त्यांच्या स्टाफ मेंबर्स आणि जवळच्या मित्राचा समावेश आहे.

दरम्यान, यापूर्वी समाजवादी पक्षाचे माजी नेते अमर सिंह आणि वरिष्ठ पत्रकार नलिनी सिंह यांची देखील याप्रकरणी चौकशी झाली होती. 17 जानेवारी, 2014 रोजी दक्षिण दिल्लीतील एका फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये सुनंदा मृतावस्थेत आढळून आल्या होत्या. या घटनेच्या एक दिवसआधी सुनंदा आणि थरूर यांच्या कडाक्याचे भांडण झाले होते.

पाकिस्तानी पत्रकार मेहर तरार आणि शशी थरूर यांच्या कथित प्रेम प्रकरणाविषयी सुनंदा यांना भनक लागल्याची माहिती मिळाली होती. यावरून सुनंदा यांची आत्महत्या नसून हत्या असल्याचा संशय दिल्ली पोलिसांना आहे.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा, सुनंदा-शशी-मेहेर हा प्रेमाचा त्रिकोण?