आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shashi Tharoor Says Afzal Gurus Hanging Was Wrong It Was Handled Badly

अफझल गुरुच्या फाशीवर काँग्रेस खासदार शशी थरुर यांनी दोन वर्षानंतर उपस्थित केला सवाल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - काँग्रेस खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री शशी थरुर यांनी 2001 मध्ये संसदेवरील हल्ल्यातील दोषी अफझल गुरुच्या फाशीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. थरुर यांनी ट्विटरवरील पोस्टवर अफझल गुरुला फाशी देणे चुकीचे होते, त्याबरोबरच हे प्रकरण चुकीच्या पद्धतीने हताळले गेले असल्याचे म्हटले आहे. थरुर यांच्या या ट्विटने त्यांच्याच पक्षाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. अफझल गुरुला दोन वर्षांपूर्वी आजच्या दिवशी (9 फेब्रुवारी 2013) फाशी देण्यात आली होती.
अफझलच्या फाशीबद्दल केलेल्या ट्विटमध्ये थरुर म्हणतात, 'मला मान्य आहे फाशी देणे चुक होते आणि ज्या पद्धतीने ते प्रकरण हताळले गेले तेही चुक होते. अफझलच्या कुटुंबीयांना आधी सांगण्याबरोबरच त्याला शेवटच्या क्षणी भेटण्याचीही संधी द्यायला हवी होती. त्यासोबतच फाशीनंतर त्याचा मृतदेह त्यांना दिला पाहिजे होता.' थरुर हे काँग्रेसचे खासदार असून अफझल गुरुला फाशी दिली तेव्हा काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होते. त्यामुळे स्वपक्षीय खासदारानेच दोन वर्षांनंतर आपल्याच सरकारच्या एका निर्णयावर प्रश्न उपस्थित केल्याने नवा वाद निर्माण होऊ शकतो.