आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shashi Tharoor Sunanda Pushkar And Mehr Tarar Latest News

पाकिस्तानी पत्रकाराला पती-पत्नीमधील \'वो\' ठरविणा-या सुनंदा पुष्कर यांची \'सत्यकथा\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दि्ल्ली - केंद्रीय राज्यमंत्री शशी थरुर यांचे पाकिस्तानी पत्रकार मेहर तरार यांच्यासोबतच्या कथित प्रेमप्रकरणानंतर थरुर दाम्पत्य पुन्हा एकदा चर्चेत आले होते. थरुर आणि तरार प्रकरण चर्चेचा विषय झाल्यानंतर थरुर दाम्पत्याने, काही चुकीच्या ट्विट्समुळे वाद निर्माण झाल्याचे एकत्रीतरित्या सांगितले होते. त्यानंतर हा वाद मिटला असे वाटत असतानाच शुक्रवारी रात्री सुनंदा पुष्कर यांच्या गुढ मृत्यू झाल्याची बातमी समोर आली.
बुधवारी (15 जानेवारी ) सुनंदा पुष्कर यांनी आरोप केला, की पाकिस्तानी पत्रकार मेहर तरार आणि थरुर यांचे विवाहबाह्य संबंध आहेत. त्या एवढ्यावरच थांबल्या नाही तर, त्यांनी थरुर यांच्यासोबत घटस्फोट घेण्याचेही बोलून दाखवले. त्यांनी मेहर तरार पाकिस्तानची गुप्तहेर संस्था आयएसआयच्या एजंट असल्याचा आरोप देखील केला होता. या ट्विटर वॉर नंतर झालेला सुनंदा यांचा मृत्यूने गुढ वाढविले आहे.
पुढील स्लाइडमध्ये, कोण आहेत सुनंदा पुष्कर आणि कशी झाली थरुर - सुनंदा यांची भेट