आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shashi Tharoor Want To Marry Pakistani Journalist Mehar Tarar New Delhi

शशी थरूर यांना करायचे होते पाक पत्रकार मेहर तरारशी लग्न, वृत्तवहिनीचा दावा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सुनंदा पुष्करच्या गूढ मृत्यूनंतर या वादाप्रकरणी आणखी एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. एका वृत्तवाहिनीने केलेल्या दाव्यानुसार शशी थरूर यांना पाकिस्तानी पत्रकार मेहेर तरार हिच्याशी लग्न करायची इच्छा होती. लोकसभा निवडणुकांच्या नंतर हा विवाह होणार होता. वाहिनीने तपास अधिका-यांसमोर नोंदवलेल्या जबाबाच्या आधारे हा दावा केला आहे. सुनंदा पुष्कर यांचे मित्र आणि नीकटवर्तीय यांनी दिलेले हे जबाब आहेत. त्यापैकी सुनंदा यांची मैत्रिण पत्रकार नलिनी सिंह आणि नोकर नारायण सिंह यांचे जबाब अत्यंत महत्त्वाचे असल्याचे मानले जात आहे. त्यानुसार थरूर यांचे मेहेरशिवाय इतरही अनेक महिलांबरोबर संबंध होते. त्याबाबत समजल्यानंतरच सुनंदा आणि थरूर यांच्यात वाद निर्माण झाला होता.
या जबाबानुसार जून 2013 मध्ये थरूर आणि मेहर यांची दुबईत भेट झाली होती. त्यावेळी दोघे तीन दिवस सोबत राहिले. सुनंदाच्या मित्रांनी तिला पुराव्यासह या सर्वाची माहिती दिली होती. नलिनी सिंह यांच्या जबाबानुसार मेहर प्रकरणी सुनंदाला बीबीएम अकाऊंटद्वारे डीलीट केलेले मॅसेज रिट्रीव्ह करायचे (परत मिळवायचे) होते. त्यासाठी त्यांनी नलिनी यांची मदत मागितली होती. नारायण सिंह यांच्यामते तिरुअनंतपुरमहून दिल्लीला येताना 15 जानेवारीला विमानातही या दोघांचे भांडण झाले होते.

मी वक्तव्यावर कायम : थरूर
वाहिनीने दिलेल्या माहितीनुसार यासंदर्भात प्रतिक्रिया देताना शशी थरूर आपल्या दोन जुलैच्या वक्तव्यावर कायम असल्याचे सांगितले. या प्रकरणी तर्क लावणे बंद व्हावे यासाठी तपास पारदर्शक आणि लवकर व्हावा. त्यासाठी आम्ही तपासात पूर्ण सहकार्य केले आहे, अशी प्रतिक्रिया त्यावेळी थरूर यांनी दिली होती.
काय आहे प्रकरण?
17 जानेवारी 2014 रोजी नवी दिल्ली येथील लीला पॅलेस हॉटेलच्या खोली क्रमांक 345 मध्ये सुनंदा पुष्कर यांचा मृत्यू झाला होता. केंद्रीय मंत्री शशी थरूर यांच्या पत्नी असलेल्या सुनंदा यांच्या या मृत्यूने अनेक प्रश्न उपस्थित केले होते. त्याचे कारण म्हणजे त्यांच्या मृत्यूच्या दोन दिवसांपूर्वीच या दोघांच्या वादाच्या बातम्या आल्या होत्या. त्यांच्यात पाकिस्तानी पत्रकार मेहेर तरार यांच्यावरून वाद जाला होता. मात्र त्यावेळी या दोघांनीही मिडियासमोर आपल्यात असा कोणताही वाद नसल्याचे स्पष्ट केले होते.
फोटो - फाईल फोटो
पुढील स्लाइडवर पाहा... तरार, थरूर आणि पुष्कर यांचे या संपूर्ण वादातील काही ट्वीट्स...