आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...आणि शशिकला पुष्पांना राज्यसभेत अश्रू अनावर!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - राज्यसभेत सोमवारी एक नाट्यपूर्ण घटना घडली. ‘पक्षाच्या नेत्याने आपल्याला थापड मारली अाहे. तामिळनाडूत आपल्या जिवाला धोका आहे. राज्यसभेचा राजीनामा देण्यासाठी दबाव आणला जात आहे,’ असा दावा अद्रमुकच्या महिला खासदार शशिकला पुष्पा यांनी केला. हे सांगताना त्यांना अनेकदा अश्रू अनावर झाले.

खासादर शशिकला पुष्पा यांचा शनिवारी दिल्ली विमानतळावर द्रमुकचे खासदार तिरुची सिवा यांच्याशी वाद झाला होता. त्या वादातून त्यांनी सिवा यांच्या श्रीमुखात भडकावली होती. त्यामुळे त्या वादात सापडल्या होत्या. त्यानंतर त्यांना अद्रमुकच्या ‘नेत्या’ने थापड मारल्याचे वृत्त आहे.
े कामकाज सुरू होताच पुष्पा यांनी सभागृहाच्या हौद्यात धाव घेतली आणि वक्तव्य करण्याची परवानगी मागितली. त्या म्हणाल्या की, ‘आमच्या पक्षाच्या नेत्याने मला थापड मारली आहे. राज्यसभेचा राजीनामा देण्यासाठी माझ्यावर दबाव टाकला जात आहे. देशात महिला सुरक्षित आहेत का? तामिळनाडूत माझ्या जिवाला राज्य सरकारकडून धोका आहे. त्यामुळे मला संरक्षण देण्यात यावे. एखाद्या खासदाराला नेत्याकडून मारहाण होत असल्यास मानवी प्रतिष्ठा कुठे आहे’, असा प्रश्न त्यांनी विचारला. ‘मला देशाची सेवा करायची आहे, राजीनामा द्यायचा नाही. राज्यसभेत पाठवल्याबद्दल मी पक्षाची आभारी आहे, पण जर एखादा नेता खासदाराला थापड लगावत असेल तर मला सरकारकडून संरक्षणाची गरज आहे. ’हे सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले होते. पण कोणी आणि केव्हा थापड मारली हे मात्र त्यांनी सांगितले नाही.

अद्रमुकमधून निलंबित
पक्षविरोधी कारवाई केल्याने खासदार शशिकला पुष्पा यांना अद्रमुकच्या प्रमुख जयललिता यांनी पक्षातून निलंबित केले. शशिकला यांनी पक्षाची प्रतिष्ठा धोक्यात आणली, असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
बातम्या आणखी आहेत...