आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मला डावलल्याची भाजपला किंमत माेजावी लागली : शत्रुघ्न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- ‘बिहार विधानसभा निवडणुकीत मला प्रचारात सहभागी करून घेतल्याचे परिणाम पक्षाला भाेगावे लागले,’ अशा शब्दांत प्रसिद्ध अभिनेते तथा भाजपचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी बुधवारी अापल्याच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचा समाचार घेतला.

शत्रुघ्न सिन्हा यांचे अात्मचरित्र ‘एनीथिंग बट खामाेश’ या पुस्तकाचे प्रकाशन बुधवारी ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या हस्ते करण्यात अाले. या कार्यक्रमात सिन्हा यांनी स्वपक्षीयांवर फटकेबाजी केली. ‘छाेडाे कल की बातें, कल की बात पुरानी.... मागील राग- लाेभ विसरून मी पुढे जाऊ इच्छिताे,’ असे ते म्हणाले.

या कार्यक्रमास माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा, भाजपमधून निलंबित करण्यात अालेले नेते खासदार कीर्ती अाझाद यांचीही विशेष उपस्थिती हाेती. पक्षावर नाराज असलेले यशवंत सिन्हा यांनीही भाजप नेत्यांवर ताेंडसुख घेण्याची संधी साेडली नाही. ‘जे लाेक बिहारमध्ये भाजपचा प्रचार करत हाेते, कदाचित त्यांना अामची गरज वाटली नव्हती,’असा टाेला त्यांनी पंतप्रधान माेदी पक्षाध्यक्ष अमित शहा यांचे नाव घेता लगावला.

अडवाणींकडून माफी
बिहारमधून राज्यसभेवर पाठवण्यात अाल्याने शत्रुघ्न सिन्हा अडवाणींवर पूर्वी नाराज हाेते. ताे धागा पकडून अडवाणी म्हणाले, ‘शत्रुघ्न सिन्हाजी खूप लाेकप्रिय व्यक्तिमत्त्व अाहेत. मात्र काेणालाही तिसऱ्यांदा राज्यसभेवर पाठवण्याचा त्या वेळी पक्षात नियम हाेता म्हणून अाम्ही त्यांना राज्यसभेवर पाठवता लाेकसभेची उमेदवारी दिली ते निवडूनही अाले. मात्र त्या वेळी राज्यसभा नाकारल्याबद्दल मी त्यांची माझी मागताे.’ त्यावर शत्रुघ्न म्हणाले, ‘अडवाणीजी, तुमच्या निर्णयावर मी कधीच नाराज नव्हताे. उलट त्यामुळेच मला लाेकसभा लढण्याचे बळ मिळाले.’ मात्र यात हस्तक्षेप करत यशवंत सिन्हा म्हणाले, ‘सलग तिसऱ्या वेळेला राज्यसभेवर पाठवण्याचा भाजपमध्ये नियम अाहे. मात्र अाजही पक्षात असे काही नेते अाहेत की ज्यांना अनेक वेळा राज्यसभेवर पाठवण्यात अाले अाहे.’
बातम्या आणखी आहेत...