आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शत्रुघ्न 15 वर्षानंतर थिएटरमध्‍ये, सुषमा आणि स्मृतींसह यांची उडवली खिल्‍ली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- शत्रुघ्न सिन्हा 15 वर्षानंतर थिएटरमध्‍ये दिसले. दिल्लीच्‍या सिरी फोर्ट ऑडिटोरियममध्‍ये झालेल्‍या ‘पती, पत्नी और मैं’ या प्लेमध्‍ये मुख्‍यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्‍या आग्रहाखातर शत्रुघ्न परफॉर्म करण्‍यासाठी गेले. प्ले दरम्‍यान त्‍यांनी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज, स्मृती ईराणी, उमा भारती आणि सेंसर बोर्डाचे अध्‍यक्ष पहलाज निहलानी यांच्‍यावर विनोद केला. एका सीनमध्‍ये को-आर्टिस्‍टला म्‍हटले- सुषमा स्वराजसारखी उदास का उभी आहेस. सरकारचा दावा होता की, प्‍ले पाहताना पोट धरुन हसायला येईल.
- दिल्ली सरकारने या इस नाटकासाठी आर्थिक मदद केली होती.
- सरकारने दावा केला होता की, प्ले पाहणा-याला 2 तासात 200 वेळा हसू येईल.
- प्लेमध्‍ये सिन्‍हा यांच्‍यासोबत थिएटर आणि सिनेकलाकार राकेश बेदी आणि महिला को- आर्टिस्टही होते.
- शत्रुघ्न यांनी याआधी ‘पती, पत्नी और मैं’ या नाटकात 2001 मध्‍ये अभिनय केला होता.
नेता, अभिनेत्‍यांची उडवली खिल्‍ली..
अमिताभ
- सिन्हा यांनी आपल्‍याबाबत बोलताना सांगितले, ‘मी अलाहाबादचा आहे. पुढे थोडे थांबून ते म्‍हणाले- ‘का फक्‍त अमिताभ बच्चनच अलाहाबादचे आहेत का?’
सुषमा स्वराज
नाटकाच्‍या दरम्‍याने ते आपल्‍या को-आर्टिस्टला म्‍हणाले, ‘सुषमा स्वराजसारखी उदास का उभी आहेस?’
स्मृती ईराणी
स्मृती ईराणी यांचे नाव घेऊन एका सीनवर ते म्‍हणाले, ‘मी स्मृती ईराणीनंतर सीरियल्स पाहणे बंद केले आहे.'
उमा भारती
एका डायलॉगमध्‍ये सिन्‍हा यांनी उमा भारतींचे नाव घेतले. ते म्‍हणाले, ‘अरे उमा भारती, ऋतंभराजी पाहा, आपल्‍या भाषणांचा रेकॉर्ड तुटत आहे.’
फारुख अब्दुल्ला
एका संवादात सिन्हा म्‍हणाले, ‘फारुख अब्दुल्लाकडून शिका, बाईक राइडमध्‍ये बाईक नाही, तर मुलगी महत्‍त्वाची असते.’
पहलाज निहलानी
- प्लेमधील एका किसिंग सीनबाबत सिन्‍हा यांनी सेंसर बोर्डाचे अध्‍यक्ष पहलाज निहलानी यांच्‍यावर नेम साधला. ते म्‍हणाले- ‘लाइट डिम करा, पहलाज निहलानी यालाही सेंसर करतील. ते सीन न पाहता कट करतात.’
केजरीवाल कुटुंबियांसोबत उपस्थित..
- या नाटकाला केजरीवाल कुटुंबियांसोबत उपस्‍थित होते.
- आप नेते आणि दिल्‍ली पोलिसांवरही सिन्‍हा यांनी काही विनोद केले.
- ते म्‍हणाले, ‘हम दिल्ली पुलिस हैं, हम समझते नहीं, समझाते हैं. चाहे तो 'आप' वालों से पूछ लो.’
- वैवाहिक जिवणावर विनोद करताना ते म्‍हणाले, ‘एक मनुष्‍य लग्‍नानंतर आनंदी राहू शकत नाही; एक तर तो आनंदी असेल किंवा विवाहीत.’
'आपला आहे आपला राहिल'
- नाटक संपल्‍यानंतर शत्रुघ्न केजरीवालसह आप नेत्‍यांना भेटले.
- ते म्‍हणाले, ''मी आपला आहे आणि आपला राहिल.''
- शेवटी त्‍यांनी त्‍यांचा प्रसिद्ध डायलॉग 'खामोश'ही म्‍हटला.
- दिल्ली सरकारने गुरुवारी या नाटकाचे आयोजन केले होते.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, नाटकाचे फोटो..
बातम्या आणखी आहेत...