आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शत्रू म्हणाले वाट पाहिली असती तर काही आभाळ कोसळले नसते

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवीदिल्ली- भाजपचे असंतुष्ट नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी शनिवारी पुन्हा नाराजीचा सूर छेडला. अरुणाचल प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची काहीच गरज नव्हती. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयापर्यंत वाट पाहायला हवी होती. प्रतीक्षा केली असती तर काही आभार कोसळले नसते, असे त्यांनी म्हटले आहे.

पाटणासाहिबचे ७० वर्षीय भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मोठमोठ्या सल्लागारांवर’ टीका केली. अनेक मुद्द्यांवर पक्षाच्या भूमिकेच्या विरोधात जाणारे शत्रुघ्न म्हणाले, हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. त्यामुळे आपण सतर्क आणि सावधान राहायला हवे होते. मला वाटते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयापर्यंत वाट बघितली असती तरी आभार कोसळले नसते. उलट आपण वादात सापडलो नसतो आणि लाजिरवाणी वेळही आली नसती.