आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शत्रुघ्न सिन्हांचा यशवंत सिन्हांना पाठिंबा, म्हणाले- त्यांच्या सूचना नाकारणे बालिशपणा ठरेल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांवर कडाडून हल्ला करणाऱ्या यशवंत सिन्हा यांना शत्रुघ्न सिन्हा यांनी पाठिंबा दिला आहे. त्यांनी एका पाठोपाठ एक ट्विट करत म्हटले आहे, की सिन्हा यांच्या सूचना नाकारणे बालिशपणा ठरेल. ते एक निष्ठावान राजकारणी आहेत. त्यांनी देशाच्या आर्थिक स्थितीचा आरसा दाखवला आहे. 
 
सिन्हा एक निष्ठावान नेते 
- बिहारचे भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी यशवंत सिन्हा यांनी सरकारच्या अर्थधोरणावर दाखवलेला आरसा योग्य असल्याचे म्हटले आहे. त्यांनी ट्विट करुन सिन्हा यांना पाठिंबा दर्शवला आहे. 
- शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, की त्यांनी (यशवंत सिन्हा) अर्थमंत्री म्हणून स्वतःला सिद्ध केले आहे. त्यांनी देशाच्या आर्थिक स्थितीचा आरसा दाखवला असून समस्येच्या मुळावर घाव घातला आहे. 
- माजी अर्थमंत्र्यांनी मांडलेले विचार आणि सूचना सपशेल नाकारणे बालिशपणाचे ठरेल. याउलट त्यांचे कौतूक केले पाहिजे.

'सिन्हा आणि शौरींना मंत्री व्हायचे नाही' 
- एका ट्विटमध्ये शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, 'यशवंत सिन्हा आणि अरुण शौरी हे दोघेही अनुभवी आणि बुद्धीमान नेते आहेत. दोघांनाही आता कोणतीही आपेक्षा नाही, किंवा त्यांना कोणत्या पदाची अभिलाषा आहे. आणि तेही तेव्हा जेव्हा निवडणुकीला फक्त दोन वर्षे राहिले आहेत.'
- यशवंत सिन्हा आणि अरुण शौरी हे अटलबिहारी वाजपेयींच्या सरकारमध्ये मंत्री होते. शौरी देखील मोदी सरकारच्या धोरणांवर वेळोवेळी टीका करत आले आहेत. 
 
काय म्हणाले होते सिन्हा... 
- सिन्हा यांनी 'I need to speak up now' (मला आता बोलावच लागेल) या शिर्षकाखाली लेख लिहिला. 
- त्यांनी लेखात म्हटले आहे, की अर्थव्यवस्था आधीच डबघाईला आली असताना नोटबंदी करुन मोदी सरकारने आगीत तेल ओतण्याचे काम केले. 
- 'देशाची अर्थव्यवस्था बिघडत चालली आहे, अशावेळेस जर मी चूप राहिलो तर राष्ट्रीय कर्तव्यासोबत अन्याय ठरेल.' 
 
नोटाबंदी आर्थिक अापत्ती
अर्थमंत्र्यांचा ओव्हरटाइम
:सिन्हा म्हणाले, ‘भारतीयांना गरीब दाखवण्यासाठी अर्थमंत्री ओव्हरटाइम करत आहेत. २०१९ च्या निवडणुकीपर्यंत अर्थव्यवस्थेत वेगाची अपेक्षा करता येत नाही.’
अर्थव्यवस्थेवर :प्रत्येक क्षेत्र संकटात आहे. खासगी गुंतवणूक दोन दशकांच्या नीचांकावर आहे. औद्योगिक उत्पादन, कृषी, वीजनिर्मिती उद्योग आदी सर्व ठिकाणी सुस्ती आहे. जीएसटीमुळे व्यापारजगतात खळबळ आहे. लाखो नोकऱ्या गेल्या आहेत.
धाडसत्रावर :विरोधी पक्षात असताना आम्ही धाडसत्रांना विरोध करायचो. आता हा नित्यक्रम झाला आहे. लोकांत भयाचे वातावरण आहे.
बातम्या आणखी आहेत...