आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Shatrughna Sinha Firm On His Statement About Nitish Kumar But Yashwant Sinha Takes U Turn

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'शॉटगन' बंडखोरीच्‍या पावित्र्यात, यशवंत सिन्‍हांचा मोदींबाबत 'यू टर्न'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- बिहारचे मुख्‍यमंत्री नितीशकुमार यांची स्‍तुति करणारे भारतीय जनता पक्षाचे नेते शत्रुघ्न सिन्‍हा पुन्‍हा एकदा वादात अडकले आहेत. सिन्‍हा यांनी भाजपविरुद्ध बंडाचाच झेंडा उगारल्‍याचे चित्र असून त्‍यांनी पक्ष नेतृत्त्वाला आव्‍हान दिले आहे. दुसरीकडे पक्षाचे ज्‍येष्‍ठ नेते यशवंत सिन्‍हा यांनी आधीच्‍या वक्तव्‍यावरुन घुमजाव करत गुजरातचे मुख्‍यमंत्र नरेंद्र मोदी हेच पुढील पंतप्रधान होतील, असा दावा केला आहे.

शत्रुघ्‍न सिन्‍हा यांनी नितीशकुमार हेच पंतप्रधानपदासाठी लायक असल्‍याचे म्‍हटले होते. त्‍यानंतर बिहारच्‍या प्रदेश भाजपने त्‍यांच्‍याविरुद्ध कारवाईची मा‍गणी केली आहे. सिन्‍हांबाबत आज (गुरुवार) सायंकाळी पक्षाच्‍या समन्‍वय समितीच्‍या बैठकीत निर्णय होण्‍याची शक्‍यता आहे. सध्‍या सिन्‍हा यांची तुलना पक्षाने कॉंग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंह यांच्‍यासोबत केली आहे. दिग्विजय यांच्‍याप्रमाणेच सिन्‍हा यांची वक्तव्‍ये फार गांभीर्याने न घेण्‍याचे ठरविले आहे. दुसरीकडे शॉटगनने वक्तव्‍यावर ठाम असल्‍याचे स्‍पष्‍ट केले आहे. कोणत्‍याही कारवाईची चिंता नसल्‍याचे स्‍पष्‍ट करताना त्‍यांनी सांगितले, की पक्षात माझी ज्‍येष्‍ठता आणि अनुभवाकडे दुर्लक्ष करण्‍यात येत आहे.

यशवंत सिन्‍हा यांनी 'यू टर्न' घेतला. ते म्‍हणाले, नरेंद्र मोदी हेच देशाचे पुढचे पंतप्रधान राहतील. यापूर्वी यशवंत सिन्‍हा यांनी नरेंद्र मोदीनी जास्‍त बोलू नये, असा सल्‍ला दिला होता. ते जेवढे जास्‍त बोलतील, तेवढेच वाद होतील, असे सिन्‍हा म्‍हणाले होते.

दरम्‍यान, राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघ आणि भाजपच्‍या ज्‍येष्‍ठ नेत्‍यांची बैठक सुरु आहे. त्‍यात नरेंद्र मोदींसह अनेक नेत्‍यांचा सहभाग आहे. मात्र, लालकृष्‍ण अडवाणीं आणि मुरली मनोहर जोशी हे दोन बडे नेते या बैठकीपासून दूर राहिले.