आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाजियांच्या राजीनाम्यानंतर \'आप\'ने मान्य केली चूक, कुमार विश्वासने साधला निशाणा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीतील जोरदार पराभव आणि त्यानंतर आम आदमी पार्टीचे (आप) नेते अरविंद केजरीवाल यांना सुरु असलेला तुरुंगवास या दरम्यानच पक्षाच्या दोन नेते शाजिया इल्मी आणि कॅप्टन गोपीनाथ यांनी शनिवारी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. शाजिया यांच्या राजीनाम्यावर पक्षाने खेद व्यक्त केला आहे. मात्र, निवडणुक निकालांपासून अज्ञात वासात असलेले कुमार विश्वास यांनी तुळशीदासाच्या चौपाईच्या माध्यमातून शाजिया इल्मी यांच्यावर निशाणा साधला आहे. विश्वास यांनी ट्विटर आणि फेसबुकवर लिहिले आहे, 'धिरज धरम मित्र अरु नारी, आपद् काल परखिए चारी'

शाजियांनी सांगितेल
शाजिया इल्मी यांनी आज (शनिवार) पत्रकार परिषदेत राजीनाम्याची घोषणा केली. त्या म्हणाल्या, 'गाझियाबादमधील पराभवामुळे नाही तर, पक्षात लोकशाही नसल्यामुळे राजीनामा देत आहे.' त्या म्हणाल्या, 'आपमध्ये लोकशाही नाही. केजरीवाल केवळ चार चेह-यांना सोबत घेऊन निर्णय घेतात.'
शाजियांनी हे सांगितले नाही
- शाजियांनी केजरीवालांसोबत कोणती चौकडी असते याचा उल्लेख केला नाही.
- सुरवातीपासून आतापर्यंत केजरीवालांची काम करण्याची पद्धत सारखीच आहे. तरीही त्यांनी राजीनामा देण्यासाठी एवढा काळ का घेतला.
शाजिया इल्मी जे सांगू शकत नाही
- लोकसभा निवडणुकीत पक्षाची दारूण अवस्था यामुळे त्यांना पक्षात भविष्य दिसले नाही.
- दिल्ली विधानसभेत केवळ 500 मतांनी पराभव आणि गाझियाबाद लोकसभा निवडणुकीत अनामत रक्कम देखील वाचवू शकल्या नाही. त्यामुळे त्यांना पुढे काही चमकदार कामगिरी होईल याबद्दल विश्वास राहिला नाही.
- राजकीय महत्त्वाकांक्षेपोटी नवा पर्याय शोधणे गरजेचे होते.
पक्ष काय म्हणाला
पक्षाचे नेते योगेंद्र यादव म्हणाले, पक्षान अनेक चुका केल्या आहेत. त्यावर दोन दिवसांपासून मंथन सुरु आहे.
यादव म्हणाले, 'शाजिया पक्षाच्या संस्थापक सदस्य होत्या. गेल्या दोन महिन्यांपासून त्या नाराज होत्या. त्यांनी पक्षाच्या व्यासपीठावर त्यांची नाराजी व्यक्त केली नाही, मात्र त्यांनी अनेक नेत्यांना पत्र पाठवून रोष व्यक्त केला होता. पक्षाने त्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत तुमच्या प्रश्नांना उत्तर दिले जाईल असे सांगितले होते. अरविंद तुरुंगात असताना त्यांनी असा निर्णय घ्यायला नको होता.'
योगेंद्र यादव यांनी शाजिया परत पक्षात येतील असा विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले, 'आम्हाला शाजिया यांची कमतरता भासेल. मला विश्वास आहे, भ्रष्टाचाराच्या विरोधातील आमच्या आंदोलनात आज ना उद्या त्या परत आमच्या सोबत असतील.'

पुढील स्लाइडमध्ये, शाजिया विरोधात वॉरंट जारी...