आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाजिया इल्मींचा अनिच्छेने प्रचार तर सिद्धूचा अमृतसरमध्ये प्रचारास नकार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - निवडणुकीचा ज्वर जसजसा चढतोय तसतसे नेत्यांचे हेवेदावेही पुढे यायला लागले आहेत. प्राप्त माहितीनुसार, आम आदमी पार्टीच्या शाजिया इल्मी यांचे निवडणुकीच्या प्रचारात मन लागत नाहीये, तर दुसरीकडे आतापर्यंत ज्या नवज्योत सिद्धूंच्या नावाने अरुण जेटली गवगवा करत होते त्यांनीच जेटलींचा अमृतसरमधून प्रचार करण्यास नकार दिला आहे. इकडे जसवंतसिंह यांनीसुद्धा स्पष्ट केले आहे की, भाजपकडून अद्याप त्यांच्याशी कोणीच संपर्क केला नाही. तर संरक्षणमंत्री ए. के. अँटनी यांनी मोदींना रोखण्यासाठी काँग्रेसला अन्य पक्षांचा बाहेरून पाठिंबा घेण्याची भाषा केली आहे. यात राजनाथसिंहसुद्धा मागे नाहीत. आपण 2003 मध्ये केंद्रीय मंत्रिपद भूषवले आहे. त्यामुळे या वेळी भाजपचे सरकार बनल्यास मंत्रिपद घेण्याची इच्छा नसल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. अशाच काही नेत्यांचे वक्तव्य आणि त्यांच्या भूमिकांविषयी जाणून घेऊया...

शाजिया इल्मींना गाझियाबादमधून निवडणूक लढवायची नव्हती?
आम आदमी पार्टीकडून गाझियाबादची निवडणूक लढवत असलेल्या शाजिया इल्मी उमेदवारीबाबत जास्त गंभीर नसल्याचे दिसत आहे. येथून भाजपचे उमेदवार जनरल व्ही. के. सिंह आणि काँग्रेसचे राज बब्बर मैदानात आहेत. दरम्यान, शाजिया इल्मी प्रचारकार्यासाठी पूर्ण वेळ देत नसल्यामुळे त्यांची प्रचार टीम त्यांच्यावर नाराज आहे. टीमने इल्मींकडून याबाबत लिखित उत्तर मागितले आहे. प्रचारकार्यात त्या वेळेवर का पोहोचत नाहीत याचे स्पष्टीकरण त्यांच्याकडून मागितले जाणार आहे. अशातच प्रश्न उपस्थित होतोय की, शाजिया इल्मी गाझियाबादमधून निवडणूक लढण्यास मनापासून तयार आहेत की नाही? साहिबाबादच्या खोडा गावातील एका कार्यकर्त्याने केलेल्या मेलमध्ये इल्मी प्रचारकार्यात वेळेवर पोहोचत नाहीत, असा उल्लेख आहे. आम्ही त्यांना ज्या ठिकाणी प्रचाराला घेऊन जाणार होतो त्या तिथेसुद्धा आल्या नाहीत, त्यामुळे आमचा आत्मविश्वास खचतोय, असेही त्यात म्हटले आहे.

भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसने दिले बाहेरून पाठिंब्याचे संकेत
तिरुवनंतपुरम . नरेंद्र मोदी तसेच भाजपला केंद्रात सत्तेपासून वंचित ठेवण्यासाठी काँग्रेसने बाहेरून पाठिंबा घेण्याचे संकेत दिले आहेत. याबाबत संरक्षणमंत्री ए. के. अँटनी यांनी म्हटले आहे की, ‘भाजप आणि विशेषकरून पंतप्रधानपदाच्या उमेदवारांचा अजेंडा देशाच्या एकात्मतेसाठी घातक आहे. त्यामुळे केंद्रात यूपीए-3 ची सरकार बनण्यासाठी अधिक शक्यता वाटत आहे.