आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • She Told Me To Watch The News Before Leaving Bhawnas Mother

शाईहल्‍ला करण्‍यापूर्वी भावना आईला म्‍हणाली होती, जे करणार ते न्‍यूजमध्‍ये पाहा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भावना अरोरा. (फाइल फोटो) - Divya Marathi
भावना अरोरा. (फाइल फोटो)
नवी दिल्ली - भावना अरोरा या तरुणीने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर शाईहल्‍ला करण्‍यापूर्वी आपण नेमके काय करणार हे स्‍पष्‍ट सांगितले नाही. केवळ वृत्‍तवाहिन्‍यांवर बातम्‍या पाहत राहा असे सूचक वक्‍तव्‍य तिने केले होते, अशी माहिती तिची आई लक्ष्मीदेवी यांनी दिली. भावनाला सोमवारी न्‍यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.
भावनाने कधी, कुठे आणि का केला शाईहल्‍ला...
- ही घटना रविवारची आहे. छत्रसाल मैदानात दिल्ली सरकारच्या एका कार्यक्रमादरम्यान तिने मुख्‍यमंत्र्यांच्‍या दिशेने शाई फेकली.
- दिल्‍ली सरकारच्‍या ऑड-ईव्‍हन स्कीमध्‍ये घोटाळा झाल्‍याचा आरोपही तिने केला.
- सम-विषम योजनेच्या यशस्वीतेसाठी जनतेचे आभार मानण्याकरिता रविवारी छत्रसाल स्टेडियममध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल भाषण करत असताना भावना मंचाजवळ आली. तिने केजरीवाल यांच्या दिशेने कागद फेकले आणि नंतर शाई फेकली.
- केजरीवालांनी मंचावरूनच तिला सोडून देण्यास सांगितले. ते म्हणाले, ती काही घोटाळा झाल्याचे म्हणत आहे, तिच्याकडील कागद घ्या आणि तिला सोडून द्या.
- पोलिसांनी रविवारी भावनाला मॅजिस्ट्रेटसमोर उभे केले. त्यांनी तिला सोमवारी कोर्टात हजर राहाण्यास सांगून, रात्रभरासाठी पोलिसांच्या पाहाऱ्यात घरी पाठवले.
- सोमवारी तिला एक दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
- या घोटाळ्याच्‍या स्टिंगची सीडी ती केजरीवाल यांना देण्‍याचा प्रयत्‍न करत होती. परंतु, तिला भेटू दिले जात नव्‍हते.
आईने अजून काय सांगितले....
- या घटनेबाबत माझा मुलगा पुनित याने मला सांगितले. ते ऐकून मला धक्‍का बसला.
- पुनितने सांगितले, भावनाने दिल्‍लीच्‍या मुख्‍यमंत्र्यांवर शाई फेकली आणि तिला पोलिसांनी अटक केली.
- माझी मुलगी शीघ्रकोपी आहे. केजरीवालांना भेटण्‍याचा तिने खूप प्रयत्‍न केला. पण, त्‍यात तिला यश आले नाही.
- जे झाले ते चूक झाले. परंतु, मी माझ्या मुलीच्‍या बाजूने आहे.

पुढे वाचा, पुनितने काय सांगितले ?