आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शीला पुन्हा राजकारणात, काँग्रेसला दिल्लीत सत्ता मिळवून देण्याचे असू शकते उद्दिष्ट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- केरळच्याराज्यपालपदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेस नेत्या शीला दीक्षित पुन्हा एकदा दिल्लीच्या राजकारणात सक्रिय होण्याची शक्यता आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या आधी काँग्रेस दिल्लीत पक्षाची गमावलेली प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याची दीक्षित यांच्यावर जबाबदारी देऊन त्यांना राजकारणात परत आणू शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे. शीला दीक्षित िदल्लीच्या राजकारणात परतल्या तर त्याचा पक्षाला लाभ होऊ शकतो,

अर्थात स्वत: दीक्षित यांनी यासंदर्भात स्पष्टपणे अद्याप काहीच सांगितलेले नाही. राजकारणात पुन्हा सक्रिय होण्याबाबतही त्यांनी काहीच स्पष्ट केलेले नाही, परंतु अपेक्षा अशी व्यक्त केली जात आहे की, राज्यपालपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्यावर तशी कोणतीही महत्त्वाची जबाबदारी उरलेली नाही. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाचा लाभ दिल्लीत पक्षबांधणीसाठी काँग्रेसकडून करून घेतला जाऊ शकतो. राजीनामा देण्याच्या आधी गेल्या आठवड्यात काँग्रेसच्या अनेक स्थानिक नेत्यांसोबत दीक्षित यांनी बंद खोलीत चर्चा केली होती. त्यात अनेकांनी त्यांना राजकारणात पुन्हा सक्रिय होण्याचाच सल्ला दिल्याचे समजते.

पक्षाकडूनही त्याबाबत त्यांना तशी गळ घातली जाऊ शकते. शीला दीक्षित यांची मतदारांत चांगली प्रतिमा आहे. त्याचा फायदा घेण्यासाठी पक्षाने त्यांना नेता म्हणून पुढे करावे, त्यांच्याच नेतृत्वाखाली विधानसभा निवडणुका लढवाव्यात. शीला दीक्षित दिल्लीच्या तीन वेळा मुख्यमंत्री राहिल्या आहेत. त्यांना १९९८ ते २०१३ पर्यंत मुख्यमंत्रिपदाचा अनुभव आहे. त्यांच्यासारख्या अनुभवी नेत्याला सक्रिय राजकारणापासून दूर ठेवून निवडणुका जिंकणे कठीण आहे, असे स्थानिक नेत्यांना वाटते..

शीला दीक्षित परतल्या तर स्वागतच : हर्षवर्धन
दरम्यान,केंद्रीय मंत्री भाजप नेते डॉ. हर्षवर्धन यांनी शीला दीक्षित राजकारणात परतणार असतील तर त्यांचे स्वागतच आहे, असे म्हटले आहे. आपला त्यांच्याशी व्यक्तिगत पातळीवर स्नेहबंध आहे, यापुढेही राहील. त्यांच्या राजकारणात परतण्याची आम्हाला काहीच अडचण नाही, असे हर्षवर्धन यांनी स्पष्ट केले. गेल्या वर्षी िवधानसभा निवडणुका काँग्रेसने दीक्षित यांच्या नेतृत्वाखाली लढवल्या होत्या.