आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शीला दीक्षितांविरुद्ध अरविंद केजरीवाल मैदानात!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या विरोधात मैदानात उतरणार आहेत. दीक्षित जेथून निवडणुकीला उभ्या ठाकतील, तेथूनच उमेदवारी दाखल करू. त्यांनी मतदारसंघ बदलला तर आपण तेथे जाऊ, असे केजरीवाल यांनी रविवारी पक्षाच्या बैठकीनंतर सांगितले. वर्षअखेरीस दिल्लीत निवडणूक आहे.

प्रक्रियेनंतर पक्ष याबाबत निर्णय घेईल, असे केजरीवाल यांनी स्पष्ट केले. स्क्रीनिंग कमिटीने मंजुरी दिल्यास थेट लढत देण्याची आपली तयारी असल्याचे ते म्हणाले. गेल्या वेळी दीक्षित यांच्या विरोधात दुबळा उमेदवार उभा केल्याचा आरोप त्यांनी भाजपवर केला. गेल्या निवडणुकीत गोलमार्केट मतदारसंघात दीक्षित यांनी भाजपचे कीर्ती आझाद यांचा 5,667 मतांनी पराभव केला होता. दिल्ली भाजपचे नेते विजय गोयल यांनी दीक्षित आणि आपल्याविरुद्ध लढावे, असे आव्हान केजरीवाल यांनी दिले. वीज आणि पाण्याच्या मुद्द्यावरून ‘आप’ने दीक्षित यांना लक्ष्य केले आहे. दीक्षित या भ्रष्टाचाराला पर्याय ठरल्या आहेत. जनतेला त्यांच्यापासून सुटका हवी आहे. काँग्रेसला पराभूत करू शकेल, अशी आशा भाजपकडून नाही, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे.