आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Sheikh Hasina Has Brought Pyjamas Dinner Set Rosgolla And Hilsa For Indian Leaders

प्राइम मिनिस्टर प्लीज स्टेप डाऊन... अर्थ काढला गेला- पंतप्रधान महोदय पायउतार व्हा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी बैठकीनंतर संयुक्त पत्रकार परिषद घेतली. धोरणात्मक गोष्टी पत्रकार परिषदेत झाल्या, परंतु खरी गंमत आणली निवेदकाने. पत्रकार परिषद संपल्यावर निवेदकाने दोन्ही पंतप्रधानांना आवाहन केले... ‘मे आय रिक्वेस्ट द टू प्राइम मिनिस्टर्स टू नाऊ प्लीज स्टेप डाऊन द एलिव्हेटेड पोडियम.’ इतक्यात समोरच्या लोकांतून आवाज आला ...’स्टेप डाऊन!’ हे ऐकून दोन्ही पंतप्रधानांसह उपस्थित लोकांना हसू आवरले नाही.
 
भारतीय नेत्यांसाठी अनेक भेटवस्तू घेऊन आल्या हसिना, मोदींना बॅग आईसाठी आणली साडी
बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसिना भारताच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर आलेल्या आहेत. या भेटीत त्या बरोबर अनेक भेटवस्तूदेखिल घेऊन आल्या आहेत. त्यात पायजमा, डिनर सेट, हिस्ला मासा, लेदर बॅग तसेच कालोजाम, रसगुल्ला, संदेश अशा मिठाईंचा त्यात समावेश आहे. हसिना यांनी नरेंद्र मोदींसाठी बॅग आणि त्यांच्या आईसाठी साडीही आणली. 
 
मुखर्जी-ममतांना कोणत्या भेटवस्तू.. 
- न्यूज एजन्सीच्या वृत्तानुसार शेख हसिना ज्या भारतीय नेत्यांसाठी गिफ्ट घेऊन आल्या आहेत, त्यात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, नरेंद्र मोदी, हामीद अन्सारी, सुषमा स्वराज, ममता बॅनर्जी यांच्यासह इतर नेत्यांचाही समावेश आहे. 
- डेली स्टारने बांग्लादेशच्या परराष्ट्र मंत्रालयातील सुत्रांच्या हवाल्याने सांगितले की, हसिना राष्ट्रपती मुखर्जी यांच्यासाठी पंजाबी सिल्क पायजमा, आर्टवर्क्स, एक डिनर सेट, लेदर बॅग, 4 Kg कालोजाम आणि रसगुल्ला, 2 Kg संदेश, 20 Kg हिल्सा मासे आणि 2 Kg योगर्ट सोबत घेऊन आल्या आहेत. एवढेच नाही तर प्रणव मुखर्जींची कन्या शर्मिष्ठा मुखर्जी यांना सिल्क साडीही भेट देणार आहेत. 
 
हामिद अंसारी.. 
- उपराष्ट्रपती हमीद अन्सारीसाठी हसिना एक डिनर सेट, लेदरची बॅग आणि 2 Kg रसगुल्ले तसेच कालोजाम आणि 1 Kg संदेश देऊन आल्या आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी.. 
- नरेंद्र मोदींसाठी हसिना यांनी एक लेदर ऑफिस बॅग सेट, 4 Kg रसगुल्ले आणि कालोजाम, 2 Kg संदेश आणि 4 Kg योगर्ट आले आहे. 
- मोदींच्या आईसाठीही हसिना यांनी सिल्कची साडी आणली आहे. 

सुषमा स्वराज.. 
- सुषमा स्वराज यांना एक राजशाही सिल्क साडी, टी सेट, 2 Kg रसगुल्ला आणि कालोजाम, 1 Kg संदेश आणि 2 Kg योगर्ट. 

ममता बॅनर्जी  
- एक बनारसी साड़ी, 2 Kg रसगुल्ला आणि कालोजाम, 1 Kg संदेश आणि 2 Kg योगर्ट. 

यांच्यासाठी चांदिची नाव 
- अरुण जेटली, परराष्ट्र प्रकरणांचे राज्यमंत्री विजय कुमार सिंह, स्टेट मिनिस्टर फॉर हेवी इंडस्ट्रीज अँड पब्लिक एंटरप्रायजेस बाबुल सुप्रियो या सर्वांना हसिना चांदीची एक-एक नाव भेट देणार आहेत. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
 
बातम्या आणखी आहेत...