आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Sheila Dixit Arvind Kejriwal Narendra Modi Manish Sisodia Latest News

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शीला दीक्षित यांचा निवडणुकीला रामराम; सिसोदिया होणार सीएम उमेदवार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित आता कोणतीही निवडणूक लढविणार नाहीत. त्यांनी आता निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शीला दीक्षित लोकसभा लढविणार या शक्यतांना पूर्णविराम मिळाला आहे. दुसरीकडे आम आदमी पार्टीचे संयोजक आणि नुकताच दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलेले अरविंद केजरीवाल भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्याविरोधात निवडणूक लढविण्याची शक्यता व्यक्त होत आहे. रविवारी आपने जाहीर केलेल्या लोकसभेच्या पहिल्या यादीत केजरीवालांचे नाव नाही. पुढील यादीत त्यांचे नाव असण्याची शक्यता आहे. केजरीवाल लोकसभेची निवडणुक लढविणार असतील तर, दिल्लीत मुख्यमंत्री पदाच्या उमेदवारीची माळ मनीष सिसोदिया यांच्या गळ्यात पडण्याची शक्यता आहे.
शीला दीक्षित यांचा झाला होता मोठा पराभव
दिल्ली विधानसभा निवडणुकीत नवी दिल्ली मतदारसंघातून शीला दीक्षित यांनी निवडणुक लढविली होती. त्यांना आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी 25 हजारांपेक्षे जास्त मतांनी पराभूत केले होते.