आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अयोध्येत राम मंदिर, तर लखनऊमध्ये मशीद व्हावी; शिया वक्फ मंडळाचा प्रस्ताव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ- अयोध्येत राम मंदिर वाद आणि बाबरी मशीद वाद सोडवण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून  उत्तर प्रदेश शिया सेंट्रल वक्फ बोर्डाने सर्वोच्च न्यायालयात आपला प्रस्ताव सादर केला आहे. त्यात अयोध्येत वादग्रस्त स्थळी राम मंदिर आणि लखनऊत मशीद-ए-अमन बांधण्याचा प्रस्ताव आहे. अयोध्या वादातील हा सौहार्दपूर्ण तोडगा आहे, असे बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिझवी यांनी सोमवारी पत्रपरिषदेत सांगितले.  


शिया वक्फ बोर्डाचा तोडगा सर्वाेत्तम असल्याचा दावा करत रिझवी यांनी बाबरी मशिदीचे देखभालकर्ते म्हणून अयोध्येतील जागेचे अधिकार सोडत असल्याचे सांगितले. अयोध्येऐवजी लखनऊच्या हुसेनाबादमध्ये मस्जिद- ए-अमन बांधावी. त्यासाठी सरकारने एक एकर जमीन द्यावी, असे रिझवी म्हणाले.


वादग्रस्त जागेबाबत यूपी सुन्नी वक्फ बोर्डाच्या दाव्यासंदर्भात रिझवी म्हणाले, अलाहाबाद उच्च न्यायालयाने २०१० च्या आदेशात अयोध्येतील वादग्रस्त जागेचे त्रिभाजन करत एक तृतीयांश भाग मुस्लिमांना दिला होता, सुन्नी बोर्डाला नव्हे. 


रिझवी यांच्यासोबत अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी उपस्थित होते. गिरी म्हणाले, अयोध्येत राम मंदिर बांधले जाईल. या मुद्द्यावर सर्व संबंधितांशी चर्चा करून या प्रश्नावर सौहार्दपूर्ण तोडगा काढला जाईल.

 

शिया बोर्डाच्या बनावट वकिलाची चौकशी करा : रिझवी  
शिया बोर्डाने वकालतनामा दिला नसताना आमच्या वतीने युक्तिवाद करण्यात आला. सरकारने याची चौकशी करावी, अशी मागणी रिझवी यांनी केली. अयोध्या वादात शिया बोर्ड उशिरा सहभागी झाल्याच्या आरोपावर रिझवी यांनी आमच्या बाजूने वकिलाची नियुक्ती झालेलीच आम्हाला माहीत नव्हते. बोर्डाच्या वतीने वकिलाची नियुक्ती कोणी केली याची सरकारने चौकशी करावी, असे रिझवी म्हणाले.

 

 

काय आहे शिया वक्फ बोर्डाने दिलेला पंचसूत्री फॉर्म्यूला-

१) वादग्रस्त जागेवर सुन्नी वक्फ बोर्डाचा अधिकार नाही

२) आम्ही अयोध्यातील जमिनीवरील सर्व हक्क, अधिकार सोडायला तयार
३) मात्र, त्या बदल्यात लखनौत मशिदीला जागा मिळावी, उत्तर प्रदेश सरकारने ती जबाबदारी घ्यावी
४) लखनौतील ही मशिद कोणत्याही मुलल बादशहाच्या नावाने नसावी
५) बाबरचा सेनापती शिया मुस्लिम होता

 

शिया कमिटी वसीम रिजवीला मानत नाही- इक्बाल अन्सारी

हाशिम अन्सारी यांचा मुलगा इक्बाल अन्सारी यांचे म्हणणे आहे की, वसीम रिजवी यांना शिया कमिटी मानत नाही. घोटाळ्यातून वाचण्यासाठी ते अयोध्यात राम मंदिराला जागा देण्यास तयार आहे. आमच्या येथे सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्ड जो निर्णय घेईल तोच आम्ही मानू. प्रस्ताव भले ही त्यांना दिला असेल पण आम्ही कोर्टाचाच निर्णय मान्य करू.

अयोध्या वादात कोणाचा कोणाचा पक्ष आहे?
- निर्मोही अखाडा, रामलला विराजमान, सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्ड.

 

तीनही बाजूंचा काय आहे दावा?

- निर्मोही अखाडा: गर्भगृहात विराजमान रामललाची पूजा आणि व्यवस्था निर्मोही अखाडा सुरूवातीपासून करत आहे. त्यामुळे ती जागा त्यांनाच मिळाली पाहिजे.

- रामलला विराजमान: रामलला विराजमानचा दावा आहे की, रामललाचा जवळचा मित्र आहे. कारण भगवान राम आता बाल रूपात आहेत. त्यामुळे त्यांची सेवा करण्यासाठी हे स्थान रामलला विराजमान पक्षाला दिले पाहिजे. जेथे रामलला विराजमान आहे.
- सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्ड: सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाचा दावा आहे की, तेथे बाबरी मशिद होती. मुस्लिम तेथे नमाज पडायचे. यामुळे ते ठिकाण मशिद या नात्याने आम्हाला मिळावे.

 

अलाहाबाद हायकोर्टाने काय निर्णय दिला होता?

- 30 सप्टेंबर, 2010 रोजी अलाहाबाद हायकोर्टाच्या लखनौ बेंचने वादग्रस्त 2.77 एकर जमिनीशी संबंधित 3 पक्षांना समान जागा वाटणी करण्याचे आदेश दिले होते. नंतर हे प्रकरण सुप्रीम कोर्टात पोहचले. आता पुढील सुनावणी 5 डिसेंबरला होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...