आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नरेंद्र मोदींवर प्राणघातक हल्‍ल्याची शक्‍यता, \'आयबी\'ने दिला इशारा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- पाटणातल्या साखळी बॉम्‍बस्फोटानंतर आता पंजाबमध्‍येही अशाच प्रकारच्‍या घातपाताची शक्‍यता आहे. पंजाबमधील प्रचार सभांदरम्‍यान नरेंद्र मोदींच्या जीवाला धोका असल्‍याचा इशारा गुप्‍तचर खात्‍याने दिला आहे. शिख कट्टरपंथीयांकडून मोदींवर प्राणघातक हल्‍ला होण्‍याची शक्‍यता गुप्‍तचर खात्‍याने वर्तविली आहे. याबबत पंजाब पोलिसांना सूचना देण्‍यात आली आहे.

गुप्‍तचर खात्‍याच्‍या माहितीनुसार, पाकिस्तानी सीमेवरून काही शिख कट्टरपंथिय स्फोटकांसह घुसखोरी करण्याच्या तयारीत असून प्रचारसभेत घातपातासाठी स्फोटकांचा वापर केला जाऊ शकतो. पाकिस्‍तानातून काही जणांना मोठ्या प्रमाणावर स्‍फोटकांसह पाठविण्‍याची तयारी असल्‍याचे गुप्‍तचर खात्‍याने म्‍हणले आहे.

भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर झाल्यानंतर लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर मोदी देशभर प्रचार करत आहेत.

दरम्‍यान, नरेंद्र मोदी यांच्‍या वाढत्‍या लोकप्रियतेवर नॅशनल कॉन्‍फ्रेन्‍सचे नेते तसेच जम्‍मू आणि काश्मिरचे मुख्‍यमंत्री ओमर अब्‍दुल्‍ला यांनी दखल घेतली आहे. त्‍यांनी सांगितले, की जनतेवर मोदींचा प्रभाव आहे. परंतु, मोदींची लाट नाही. दुसरीकडे कॉंग्रेसने म्‍हटले आहे, की नरेंद्र मोदींसारखा नेता देशाचे नेतृत्त्व करु शकत नाही. मोदींची प्रतिमा चांगली नाही, असे पक्षाचे नेते जगदंबिका पाल यांनी म्‍हटले आहे. भाजपने यावर प्रतिक्रीया देताना म्‍हटले आहे, की ओमर अब्‍दुल्‍ला मोदींचा प्रभाव मान्‍य करु लागले आहेत. लवकरच कॉंग्रेसलाही हे लक्षात येईल, असे किर्ती आझाद यांनी सांगितले.