आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिना हत्याकांड : इंद्राणीच्या 9 ठिकाणांवर सीबीआयचे छापे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - बहुचर्चित शिना बोरा हत्याकांडात सीबीआयने इंद्राणी व तिचा पती स्टार इंडियाचा माजी सीईओ पीटर मुखर्जीच्या ९ ठिकाणांवर सोमवारी छापे टाकले. दरम्यान, स्थानिक दंडाधिकाऱ्यांनी इंद्राणी व तिचा माजी पती संजीव खन्ना, ड्रायव्हर श्याम रॉयच्या न्यायालयीन कोठडीची मुदत ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढवली.

सीबीआय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तपास संस्थेच्या पथकांनी पीटर व इंद्राणीच्या मुंबई आणि गोव्यातील दोन-दोन घरे, गुवाहाटीत इंद्राणीच्या माहेरचे घर, ड्रायव्हर श्याम रायचे मुंबई व छिंदवाडा येथील घर आणि संजीव खन्नाच्या कोलकातास्थित घरांवर धाडी टाकल्या.
यादरम्यान, गुवाहाटीत सीबीआयच्या पथकाने शिनाचा भाऊ आणि इंद्राणीचा मुलगा मिखाइल बोराची सहा तास चौकशी केली.

२५ वर्षीय शिनाची २४ एप्रिल २०१२ रोजी हत्या झाली होती. तिच्या मृतदेहाची दुसऱ्या दिवशी रायगड जिल्ह्यातील पेणच्या जंगलात विल्हेवाट लावली होती. या प्रकरणाचे अनेक पैलू उघड झाल्यानंतर त्याचा तपास सीबीआयकडे देण्यात आला.