आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मर्डरच्या वेळी प्रेग्नंट होती शिना, इंद्राणीच्या जवळच्या व्यक्तीबरोबर होते संबंध

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - शीना बोरा आणि इंद्राणी मुखर्जी(डावीकडे) - Divya Marathi
फाइल फोटो - शीना बोरा आणि इंद्राणी मुखर्जी(डावीकडे)
नवी दिल्ली - हाय प्रोफाइल शिना बोरा मर्डर केसमध्ये रोज नवनवीन खुलासे होत आहेत. एका नव्या मिडिया रिपोर्टमध्ये करण्यात आलेल्या दाव्यानुसार ज्यावेळी शिनाचा मर्डर करण्यात आला त्यावेळी ती प्रेग्नेंट होती. शिनाचे संबंध तिची आई इंद्राणीच्या अगदी जवळच्या व्यक्तीशी असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, शिना आणि पीटर मुखर्जीचा मुलगा राहुल यांच्यात संबंध असल्याचा खुलासा यापूर्वीच झालेला आहे.

इंद्राणीच्या मित्राने केला खुलासा?
इंद्राणी मुखर्जीच्या एका अत्यंत जवळच्या मित्राबरोबर केलेल्या चर्चेच्या आधारावर एका इंग्रजी वृत्तपत्राने अनेक खुलासे केले आहेत. मुखर्जीच्या मित्राच्या मते, 'इंद्राणीचा तो नीकटवर्तीय (ज्यापासून शिना प्रेग्नंट होती) बिझनेस पार्टनरबरोबर मिटींग असल्याच्या कारणाने थायलंडला जात होता. थायलंडमध्ये तो शिनाबरोबर वेळ घालवत असल्याचे सांगितले जात आहे.

जेव्हा इंद्राणीला कळले थायलंडचे रहस्य...
या मित्राने दिलेल्या माहिती नुसार इंद्राणीला याबाबत नकळतच माहिती मिळाली. इंद्राणी शिनाचे एक पुस्तक सहज हातात घेऊन चाळत होती. त्याचवेळी तिला पुस्तकामध्ये बोर्डिंग पास मिळाले. त्यानंतर इंद्राणीने तपास केला तेव्हा तिला शिना थायलंडला कोणाबरोबर गेली होती, याबाबत माहिती मिळाली. इंद्राणीने तिच्या त्या नीकटवर्तीय व्यक्तीबरोबर शिनाबरोबर असलेल्या नात्यासंबंधी चर्चाही केली होती. पण त्या व्यक्तीने हा प्रकार अगदी नॉर्मल समजला होता. कारण तोही शिनाला इंद्राणीची बहीण म्हणूनच ओळखत होता. इंद्राणीच्या मित्राने केलेल्या दाव्यानुसार वारंवार सांगूनही तो व्यक्ती शिनाबरोबरचे नाते तोडायला तयार होत नव्हता, तेव्हा इंद्राणीने तिचा नवरा पीटरला याबाबत सांगितले होते.

शिनाला हवी होती, प्रॉपर्टी
शिनाने इंद्राणीला ती प्रेग्नंट असल्याचे सांगितले होते, अशीही माहिती समोर येत आहे. शिना त्या बाळाला जन्म देऊ इच्छित होती. त्याचबरोबर तिला संपत्तीमध्ये वाटाही हवा होता. इंद्राणीने शिनाच्या नावावर परदेशातील बँकांमध्ये पैसे जमा केले असल्याचेही समोर आले आहे.