आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shinde Pressured Me To Blaime On Sangh Leader, Convictor Bhavesh Patel

संघ नेत्यांवर आरोपासाठी शिंदे यांचा दबाव - आरोपी भावेश पटेल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - अजमेर दर्गा स्फोटप्रकरणी सरसंघचालक मोहन भागवत व इतरांची नावे घेण्यासाठी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्यावर दबाव टाकल्याचा आरोप आरोपी भावेश पटेल याने एनआयए न्यायालयात दाखल याचिकेत केला. दरम्यान, भावेश पटेल नामक व्यक्तीला ओळखत नाही. कधी भेटलोही नाही. कोणी बळेच माझे नाव घेत असेल तर काय करणार, अशा शब्दांत शिंदे यांनी भावेशच्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली.


गृह राज्यमंत्री आरपीएन सिंह यांनी शिंदे यांची भेट घालून दिल्याचे भावेश म्हणतो. सिंह यांनीही आरोपाचा इन्कार केला. मी 11 महिन्यांपूर्वी मंत्रिपदी आलो. पटेलला मार्चमध्ये अटक झाली , असे सिंह म्हणाले.एनआयएच्या आरोपपत्रात पटेलवर स्फोटातील आरोपींना शस्त्रास्त्रे पुरवल्याचा आरोप आहे. सध्या तो एनआयएच्या ताब्यात आहे.